Unauthorized Cotton Seeds : अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी करू नये

HTBT Cotton Seeds : अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व लागवड करू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
HTBT Cotton Seed
HTBT Cotton Seed Agrowon

Nanded News : अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व लागवड करू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी व बियाणे विक्री परवानाधारकांकडूनच कापुस बी.टी. बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

फसवणूक व बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे पावतीसह खरेदी करावे. अनधिकृत बीटी बियाणे खरेदीसाठी बनावट कंपन्या खासगी एजंट आमिष अथवा प्रलोभन देत असतील तर शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे कराव्यात असेही कळविले आहे.

HTBT Cotton Seed
Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

बाजारात बोगस कंपन्या, खासगी व्यक्तीमार्फत परवाना नसलेली अनधिकृत एच.टी.बी.टी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांना काही व्यक्ती (तणनाशक बीटी) (आरआरबीटी) व बीटी-बीजी-3) या नावाने संबोधतात.

HTBT Cotton Seed
Cotton Seeds : पांढऱ्या सोन्याचा काळा बाजार

(तणनाशक बीटी) (आरआरबीटी) व बीटी-बीजी-3) या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही. अशा प्रकारचे बि-बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे लागवड केलेल्या कापूस पिकाचे पानांचे नमुने व उत्पादित कापसाचे नमुने घेऊन त्यांची एचटीबीटी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे.

त्याचे नमुने तपासणीअंती एचटीबीटी जनुके आढळल्यास संबंधितावर अनुषंगिक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत एचटीबीटी बियाणे आढळल्यास त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येइल. कृषी व पोलिस विभाग सतर्क असून एचटीबीटी बियाणे विक्री करण्याऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून असल्यामुळे कोणीही हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करून नये, असेही कृषी विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com