Rabbi season  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rabbi Season : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३०,३६२ क्विंटल बियाण्यांची मागणी

Rabbi Crop Sowing in Pune : रब्बी हंगामाची पुणे जिल्ह्यात तयारी सुरू झाली असून ३० हजार ३६२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

Team Agrowon

Pune News : रब्बी हंगामाची पुणे जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३० हजार ३६२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा जिल्ह्यात खरिपात शेतकऱ्यांनी दोन हजार ९३३ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन केले होते. पुरेसा पाऊस न पडल्याने हा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. त्यातच पश्‍चिम पट्ट्यात पुरेसा पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत.

पूर्व पट्ट्यात सप्टेंबरच्या अखेरीस पाऊस झाल्याने काही प्रमाणात पाणीपातळी वाढली असली, तरी दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना अडचणीचा जाण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पुरेसा पाऊस झाल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी आहे. परंतु खरीप वाया गेल्याने रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे.

चालू वर्षी खरिपात झालेल्या कमी पावसामुळे रब्बी ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने जवळपास दोन लाख ४९ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

यात ज्वारीची सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे. रब्बी ज्वारीपाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी महाबीजकडून ११ हजार ५०० क्विंटल, खासगी कंपन्यांकडून १८ हजार ८६२ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी २९ हजार ३२५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. यामध्ये २०२०-२१ मध्ये २६ हजार ११८ क्विंटल, २०२१-२२ मध्ये ३२ हजार ७२० क्विंटल, २०२२-२३ मध्ये २९ हजार ३२५ क्विंटलची विक्री झाली होती. त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात बियाण्यांची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

रब्बी हंगामासाठी बियाण्यांची केलेली मागणी (क्विंटलमध्ये) ः

पीक --- बियाणे (क्विंटलमध्ये)

ज्वारी --- ३२५०

गहू --- १८,५६३

हरभरा --- ४२००

सूर्यफूल -- १०

करडई --- १

मका --- १८१५

इतर तृणधान्य -- ६९

इतर कडधान्य -- ४९१

इतर तेलबिया -- ११००

भाजीपाला -- ८६२

एकूण -- ३०,६६२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT