Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Demand : नंदुरबारसाठी २४ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

Team Agrowon

Nandurbar News : खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी कामाला लागला असून, कृषी विभागाने ‘महाबीज’कडे ६ हजार क्विंटल तर खासगी कंपन्यांकडे १७ हजार ५८९ क्विंटल अशी एकूण २४ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

मात्र सर्व शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध होत, जिल्ह्यात कोठेही बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा पावसाचे प्रमाण सरासरी राहणार असल्याच्या अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, मागील काळात झालेल्या अवकाळी पावसाचे दुःख बाजूला सारत बळीराजा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागलेला आहे.

त्यासाठी शेतकरी नियोजन करीत असून, बियाण्यांची खरेदी करताना दिसत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा कृषी विभागामार्फत महाबीज व खासगी कंपन्यांकडे बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी बाजरी, तूर, मूग, सूर्यफूल, भुईमूग, उडीद आदी पिकांच्या लागवडीकडे दुर्लक्ष करीत असल्याने, लागवडीच्या प्रमाणात दरवर्षी घट येत असून, या पिकांसाठी त्यानुसार कमी बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

पिकांच्या नुसार बियाण्यांची मागणी (क्विंटलमध्ये)

पीक - महाबीज- खासगी- एकूण

सं. ज्वारी- ९६३ - १४४४ - २४०७

सं. बाजरी - १२- ११२ - १२४

भात- १५८५ - २३७८- ३९६३

मका - ५११- ४५९६- ५१०७

तूर - २५८ - ३८८ - ६४६

मूग- ८८ - १३२- २२०

उडीद- १८८ - २८२ - ४७०

भुईमूग - १०६- ९५७ - १०६३

सूर्यफूल - ०.५४ - ४.८६- ५.४०

तीळ- ०० - ०१- ०१

सोयाबीन- २९४०- ४५३८- ७४७८

सं. कापूस - ०१- ०५ - ०६

सु. कापूस- ०१ - ११- १२

बीटी कापूस- ००- २७४०- २७४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT