Agriculture Center
Agriculture Center Agrowon

Fertilizer Seed Selling : खते, बियाण्यांच्या विक्रीवर राहणार भरारी पथकांची नजर

Kharif Season : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मॉन्सूनचा अंदाज पाहत शेतकरी शेती कामाची उरक करून खरिपासाठी सज्ज होत आहे.
Published on

Kharif Season Kolhapur News : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मॉन्सूनचा अंदाज पाहत शेतकरी शेती कामाची उरक करून खरिपासाठी सज्ज होत आहे. यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर खते, बियाण्यांच्या विक्रीवर भरारी पथकाची नजर राहणार आहे.

उपलब्ध साठा, विक्री, मान्यताप्राप्त बियाण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना वारंवार भेटी देण्याच्या सूचना कृषी सहायकांना दिल्या आहेत.

शासन आणि शेतकऱ्‍यांच्यादृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा मानला जातो. याच हंगामात तृण व कडधान्यांसह सोयाबीन, भात, मका, खरीप ज्वारी आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

विविध पिकांच्या पेरणीसाठी लागणारे बियाणे चांगल्या दर्जाचे असावेत, मान्यताप्राप्त खतांचा पुरवठा व्हावा, बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्‍यांचे नुकसान होऊ नये आदींबाबतची खबरदारी शासन यंत्रणा घेत असते.

Agriculture Center
Kharip Meeting: बाळासाहेब थोरातांनी खरीप हंगाम आढवा बैठक

त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागावर असते. कृषी विभागाकडून आगामी खरीप हंगामाचे नियोजन सुरू झाले आहे.

खरीप हंगामात पेरणी क्षेत्र अधिक असल्याने त्या प्रमाणात निविष्ठा लागत असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत होण्यासह दर्जाही चांगला ठेवण्याची गरज असते. खते व बियाण्यांची मागणी अधिक असते.

खरीपाच्या तोंडावर महाबीजसह अनेक खासगी कंपन्यांच्या निविष्ठा बाजारात येत असतात. या निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने कृषी विभागांना सक्त सूचना दिल्या आहेत. यामुळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्या मार्गदर्शनाने तालुका पातळीवर भरारी पथकाची नेमणूक केली आहे.

याशिवाय कृषी सहायकांनाही वारंवार कृषी केंद्रांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातून खते, औषधे व बियाण्यांचा साठा, विक्री, त्यांचा दर्जा आणि निविष्ठा मान्यताप्राप्त असल्याची खात्री करावयाची आहे. निविष्ठा विक्रीत अनुचित प्रकार आढळल्यास कारवाईचे निर्देश दिल्याचेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com