Mohol News : येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्याचा कृषी विभाग सज्ज झाला असून, शेतकऱ्यांसाठी १८ हजार ६१३ मे. टन विविध रासायनिक खतांची वरिष्ठांकडे मागणी केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील उजनी डावा कालवा, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजना या पाणी स्त्रोतामुळे तालुक्यातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तालुक्यातील लोकनेते, जकराया, भीमा व आष्टी शुगर या चार साखर कारखान्यामुळे ऊस हे नगदी पीक म्हणून गणले गेले आहे. उसाव्यतिरिक्त द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू या फळबागांचे क्षेत्र हे मोठे आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने वरील पिकासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताची आवश्यकता असते. शेतकऱ्यांमधून जादा मागणीही युरियाला असते.
गेल्या दोन वर्षांपासून पाऊस न पडल्याने जमिनी नांगरून टाकल्या आहेत. सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी बोर, द्राक्ष, सीताफळ बागांची छाटणी सुरू झाली आहे. तालुक्यात पेरू त्याच बरोबर विविध फुलशेतीच क्षेत्र हे वाढते आहे. उसाला जादा पाणी लागत असल्याने शेतकरी फळबागा लागवडीकडे वळला आहे.
अशी आहेत मागणी केलेली रासायनिक खते
युरिया- ७ हजार ५७२ मे. टन, १२ ३२ १६ - ३६३ मे. टन, १३ ३३ - २४ मे. टन, १४ ३५ १४- २८२ मे. टन, १४ २८ १४- ३६३ मे. टन, १५ १५ १५- ४०४ मे. टन, १६ २० ०-२०२ मे. टन, १९ १९ १९- २०२ मे. टन, २० २० ०-२० मे. टन, २० २० ० १३-२० मे. टन, २४ २४ ०-२५४ मे. टन. नॅनो युरिया- १० हजार ३०९ लिटर, नॅनो डीए पी-१ हजार १४६ लिटर
खरीप हंगाम १५ जून २०२४ पासून सुरू होत आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात रासायनिक खताचा तुटवडा भासू नये, यासाठी वरिष्ठांकडे जादा खते मागणी केली आहे. उपलब्धतेनुसार त्यांना ती व्यतिरिक्त करता येणार आहेत.अतुल पवार, तालुका कृषी अधिकारी, मोहोळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.