Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Fertilizers Update : चोपडा तालुक्यास यंदाच्या खरीप हंगामात २७ हजार मेट्रिक टन रासायनिक खते व ८७० क्विंटल कापूस बियाणे लागणार असून, तशी मागणी तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत करण्यात आली.
Agriculture Fertilizer
Agriculture FertilizerAgrowon

Jalgaon News : चोपडा तालुक्यास यंदाच्या खरीप हंगामात २७ हजार मेट्रिक टन रासायनिक खते व ८७० क्विंटल कापूस बियाणे लागणार असून, तशी मागणी तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत करण्यात आली. तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Agriculture Fertilizer
Agriculture Fertilizer : शेतकऱ्यांनी युरियाचा अनावश्यक वापर टाळावा

या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी उपस्थित होते. बैठकीस कृषी विभागाशी संलग्न असलेल्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंचन, जल संधारण यांसह विविध विभागांची बैठक घेण्यात आली.

तालुका स्तरावरील सर्व यंत्रणा प्रमुखांनी शासकीय योजनेबाबत तसेच पुढील हंगामातील नियोजित कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी सहायक गटविकास अधिकारी यासह विविध विभागांतील अधिकारी व पीकविमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत खरीप २०२४-२५ साठी संभाव्य खत व बियाणे मागणीबाबत चर्चा झाली.

Agriculture Fertilizer
Agriculture Fertilizers : खरिपासाठी १ लाख २३ हजार ३०० टन खते मंजूर

यात तालुक्यास एकूण २६ हजार ८५० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली. यात युरिया ७ हजार ९९५ मेट्रिक टन, डीएपी १ हजार ५०५ मेट्रिक टन संयुक्त खाते यांचाही समावेश आहे तर बियाण्यांमध्ये ज्वारी-१०० क्विंटल, मका १ हजार ६२० क्विंटल, सोयाबीन २ हजार ७० क्विंटल, कापूस ८७० क्विंटल अशी मागणी करण्यात आली.

यात कापसाचे १ लाख ८३ हजार १५७ पाकीट बियाणे मागणी करण्यात आली आहे. तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सविस्तर माहिती दिली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून योजना अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत उपस्थितांना सूचना केल्यात. इतर विभागांच्या विविध योजनेबाबत संबंधितांनी सविस्तर माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com