Arvind Kejriwal Agrowon
ॲग्रो विशेष

Arvind Kejriwal : राजकीय भूकंप! अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

CM Arvind Kejriwal Resignation Announcement : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर बाहेर आहेत. पण दोन दिवसात आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा त्यांनी केल्याने राजकीय भूकंप आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा रविवारी (ता.१५) केली आहे. तर येत्या दोन दिवसांत पक्षाच्या विधीमंडळाची बैठक घेऊन आपण निर्णय घेऊ. तसेच नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडवर देखील निर्णय घेतला जाईल असेही केजरीवाल यांनी म्हटले.

यावेळी केजरीवाल म्हणाले, 'मी दोन दिवसांनी राजीनामा देईन. पण याआधी मी लोकांना विचारेन की, मी प्रामाणिक आहे का? जोपर्यंत लोक उत्तर देत नाहीत. तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. जनतेच्या आशीर्वादाने भाजपचे सर्व कारस्थान हाणून पाडण्याची ताकद आपल्याकडे आहे.

तसेच केजरीवाल म्हणाले, 'जेव्हा लोक मला प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतील तेव्हाच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मला अग्निपरीक्षा द्यायची आहे. मी मुख्यमंत्री आणि मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री होतील तेव्हाच हे होईल. हेच आमच्या प्रामाणिक पाणाची पोचपावती असेल. दिल्लीत फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे. पण ती महाराष्ट्राबरोबरच येथे देखील व्हावी, अशी मागणी असल्याचेही केजरीवाल म्हणाले

केजरीवाल यांना अलीकडेच कथित दारू घोटाळ्याशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाली होती. ते सहा महिने तुरूंगात होते. दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज केजरीवाल यांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढून राजकीय भूकंप केला आहे. तर केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नायब राज्यपालांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसेच त्यांना दिल्लीतील सचिवालयात देखील जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर केजरीवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT