Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain: शेतात फूटभर पाणी; पेरण्या करायच्या कधी?

Crop sowing conditions: परतीच्या जोरदार पावसाने अद्याप शेतात फुटभर पाणी साचलेले आहे. आणखी किमान महिनाभर तरी पेरणीची परिस्थिती नाही.

Team Agrowon

Kolhapur news: परतीच्या जोरदार पावसाने अद्याप शेतात फुटभर पाणी साचलेले आहे. आणखी किमान महिनाभर तरी पेरणीची परिस्थिती नाही. अशा स्थितीत रब्बीचा पेरा लांबणार आहे. परिणामी बदलत्या ऋतुमानामुळे पीक पेरणीचे चक्र बदलत चालले आहे. यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस उघडीप देईल, अशी शक्यता होती.

पावसाने उघडीप दिल्यानंतर हरभरा, गहू, शाळू आदी पिकांसह दिवाळीच्या काळात ऊस लागणीचा काळही लांबणार आहे. शहर व परिसरातील शेतांमध्ये अजूनही सरी भरून पाणी साचलेले आहे. खरिपातील सोयाबीन पीक काढणीला आलेले असूनही केवळ पाणी साचल्याने सोयाबीन काढणे कठीण बनले आहे.

आगाप सोयाबीनची कापणी करून काही प्रमाणात शेतकऱ्यांची मुक्तता झाली असली तरी मागास सोयाबीन मात्र पूर्णपणे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. खाली साचलेले पाणी आणि वरून पडणाऱ्या उन्हामुळे सोयाबीनच्या शेंगा तडकून फुटत आहेत.

शेतात सध्या पांढरे सोयाबीन सर्वत्र विखुरले आहे. पीक पूर्णपणे वाळले असून शेंगाची फोलपटेच पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत शंभर टक्के नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कृषी विभागामार्फत अशा शेतीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे सध्या सोयाबीन उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेला आणि काढलेल्या सोयाबीनलाही बाजारभावानुसार दर नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. तर नव्याने पेरणी करताना साचलेल्या पाण्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत.

सध्या फूटभर रब्बीची पिके उगवून येणे अपेक्षित होते. मात्र लहरी पावसामुळे खरिपाची पिके अद्याप शेतात तशीच उभी आहेत. अशा स्थितीत रब्बी हंगाम मात्र किमान महिना, दीड महिना तरी लांबण्याची शक्यता आहे. अतिपावसामुळे बहुतांश लागण केलेल्या लावणी गेल्या आहेत. आता नव्याने आडसलीची लागण करण्याचा आलेला हंगामही लांबणार आहे.

रब्बीच्या पेरण्या वेळेत होणे गरजेचे आहे. शेतात साचलेले पाणी पाहून आणखी महिनाभर तरी शेत पेरणीयोग्य होईल, असे वाटत नाही.

- संदीप खामकर, शेतकरी, जयसिंगपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

Indian Politics: देशात पैसा, तंत्रज्ञान भरपूर; पण कमतरता इमानदारांची: नितीन गडकरी

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

US Import Duty: भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तानवर शुल्क कमी

SCROLL FOR NEXT