Parbhani News: परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२५) जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकानीपोटी राज्य शासनाने ३७४ कोटी १९ लाख ८६ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. शनिवार (ता. १८) पर्यंत महाआयटी पोर्टलवर उपलब्ध ४ लाख ३ हजार १० शेतकऱ्यांना जिल्हास्तरावरून मंजुरी देण्यात आली असून २५३ कोटी ४३ लाख ८१ हजार रुपये एवढी रक्कम महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. .यंदा जून, जुलै, ऑगस्ट या ३ महिन्यांतील अतिवृष्टी, पुरामुळे परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या ६ तालुक्यांतील ३९१ गावांतील २ लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण १ लाख ५१ हजार २२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने गुरुवारी (ता. १८) काढलेल्या शासन निर्णयाद्वारे १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे..Crop Loss Relief: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४८० कोटी रुपये मदत जाहीर.शनिवार (ता. १८) पर्यंत पोर्टलवरील १ लाख ७१ हजार ४८२ शेतकऱ्यांना जिल्हास्तरावरुन मंजुरी देण्यात आली असून ९७ कोटी २० लाख ११ हजार ३१४ रुपये (७५.६१ टक्के) रक्कम पोर्टलवर अपलोड करण्यात आली. यंदाच्या सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या परभणी जिल्ह्यातील ८२४ गावांतील २ लाख ८५ हजार ८५३ हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी ४ लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपये निधी वितरणास महसूल व वन विभागातर्फे गुरुवारी (ता. १६) काढण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. शनिवार (ता. १८) पर्यंत पोर्टलवरील २ लाख ३१ हजार ५२८ शेतकऱ्यांना जिल्हास्तरावरुन मंजुरी देण्यात आली असून १५६ कोटी २३ लाख ६९ हजार ७७० रुपये (६३.६० टक्के) रक्कम पोर्टलवर अपलोड करण्यात आली..परभणी सप्टेंबर २०२५ अतिवृष्टी अनुदान वाटप स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये, रक्कम कोटीत)तालुका बाधित शेतकरी बाधितक्षेत्र मंजूर रक्कम पोर्टलवर उपलब्ध शेतकरी अपलोड रक्कमपरभणी ७७५२३ ४८४११ ४२.२३ ३४४८६ २७.७५जिंतूर ८०९९४ ८७५२२ ७४.५४ ४९५२६ ४५.२५सेलू ४९७९१ ३००४४ २५.५७ १५८८० ९.४४.Crop Loss inspection: २६ जिल्ह्यांमध्ये पंचनामे रखडले; दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल?.मानवत ३७०२९ ३८२३१ ३२.९० २६३६६ २३.७८पाथरी २०१५९ ३६३९ ३.१९ ५८२४ १.२६सोनपेठ २३७४२ ७८२८ ६६.८६ १७६०३ ५७.५८गंगाखेड ५६०८९ ४२४२९ ३६.०८ ३५२३४ २९.११पालम ४१२५८ १२३३० १०.४८ १८८७८ ५.६०पूर्णा ५२७१२ १५४२७ १३.४४ २७७३१ ८.२६.परभणी जिल्हा जून ते ऑगस्ट अतिवृष्टी अनुदान वाटप स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये,रक्कम कोटीत)तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र मंजूर रक्कम पोर्टलवर उपलब्ध शेतकरी पोर्टलवर अपलोड रक्कमपरभणी ३१६०३ १९१३६ १६.२६ १९३६० १०.३५.सेलू ३०७१४ १९८५८ १६.८७ २४२९५ १४.५९पाथरी ४४४०९ ३०९७४ २६.३४ ३००८८ १९.३९सोनपेठ २९४९० २३९६३ २०.३६ २२५१८ १४.८१पालम ४५३४४ २७४३० २३.३१ ३२८६० १८.३३पूर्णा ५६९७० २९८६१ २५.३८ ४२३६१ १९.७०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.