Farmer Story: आपण अजूनही शिकावं आणि शहरात मस्त ‘जॉब’ करावा, असे आरतीचे स्वप्नं आहे. तर तिच्या स्वप्नपूर्तीला कधीतरी आपलाही हातभार लागावा, असे दीपकला मनोमन वाटत असते. अर्थात, दोघेही झोपेतून जागे होताच संसाराची स्वप्नं विसरतात; आणि गावच्या समस्या सोडविण्यात दिवसभर गुंतून पडतात.