Ujani Dam
Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनीच्या पाणीपातळीत घट, पाणीसाठा आला ७५ टक्क्यांवर

Team Agrowon

Solapur Ujani Dam : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारे उजनी धरण (Ujani Dharan) यंदाच्या हंगामात पूर्ण क्षमतेने सुमारे १११ टक्के (१२३ टीएमसी) भरले. पावसाळ्यात धरणामध्ये अतिरिक्त पाणीसाठा (Water Stock) झाल्याने हे पाणी खाली सोडून देण्यात आले.

त्यानंतर सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदी आणि शेतीसाठी कॅनॉल (Canal), बोगद्याद्वारे पाणी सोडल्याने उजनी जलाशयाचे हे पाणी मोठ्या झपाट्याने कमी झाले आहे. सध्या धरण ७४ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे.

पाणीसाठा एवढ्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने उजनी फुगवटा, तसेच लाभक्षेत्रातील परिसरातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.

आता कुठे उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीसाठा एवढ्या झपाट्याने खाली जात असल्याने शेतकऱ्यांनी सखल भागात पाइपलाइनचे पाइप, केबल वाढवणे वाढवावे लागत आहे.

उजनीवरून सोलापूरसाठी पाणी सोडताना शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार करून पाणी सोडले होते. परंतु या पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे आहे, अन्यथा उजनी धरण रिकामे होण्यास वेळ लागणार नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

या आधी उजनीतून शेतीसाठी व पिण्यासाठी जानेवारीमध्ये पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. त्या वेळी उजनीत शंभर टक्के पाणीसाठा होता. तर ११७ टीमसी पाणी उजनीत होते.

मात्र २३ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या २१ दिवसांत उजनीतले २५ टक्के पाणी कमी झाले, तर १२ टीमसी पाणी कमी झाले. गतवर्षी याच सुमारास उजनी जलाशयाची पाणीपातळी शंभर टक्क्यांच्या पुढे होती.

एकाच पाळीत इतके पाणी कमी झाल्याने उजनी धरणकाठ रिकामा होऊ लागला आहे. त्यामुळे पाणथळ जागा रिकाम्या होत असल्याने पक्षाची जलाशय परिसरात गर्दी होऊ लागली आहे.

उजनीची बुधवारची स्थिती

धरणाची पाणीपातळी- ४९५.६४० मीटर

एकूण पाणीसाठा- १०३.५० टीएमसी

उपयुक्त पाणीसाठा- ४०.१७ टीएमसी

पाण्याची टक्केवारी- ७४.९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT