Summer Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : हिंगोलीत उन्हाळी पेरणीत ७ हजार ९१० हेक्टरने घट

Sowing Update : हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात १८ हजार ४३८ हेक्टरवर (६९.९८ टक्के) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात १८ हजार ४३८ हेक्टरवर (६९.९८ टक्के) पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदाच्या पेरणीत ७ हजार ९१० हेक्टरने घट झाली आहे. यंदाच्या एकूण उन्हाळी पेरणीत भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ११ हजार ६१५ हेक्टर आहे. यंदा, भुईमूग ज्वारीच्या क्षेत्रात वाढ तर सोयाबीन, कडधान्ये क्षेत्रात घट झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी १४ हजार २४५ हेक्टरवर (९५.८९ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६ हजार ४६३ हेक्टर असतांना प्रत्यक्षात ११ हजार ६१५ हेक्टर (१७९.६९टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ८६७ हेक्टर (१०.३३ टक्के) पेरणी झाली आहे.

तिळाची १ हजार ३०९ हेक्टर तर सुर्यफुलाची १४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी १ हजार ३६१ हेक्टर (२४.६१ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी ९८५ हेक्टर (५१.५टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १४३ हेक्टर (४.०३ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी २ हजार ८३२ हेक्टरवर (४७.५१ टक्के) पेरणी झाली.

त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ हजार ९५ असतांना १ हजार ८९७ हेक्टर (१७३.२४टक्के), मक्याची १ हजार २ पैकी १८०९ हेक्टर (१८.९० टक्के) पेरणी झाली आहे. यंदा हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातील पेरणीत वाढ झाली तर वसमत, सेनगाव तालुक्यातील क्षेत्रात घट झाली आहे.

हिंगोली जिल्हा उन्हाळी हंगाम पेरणी स्थिती(हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हिंगोली २७८१ २९७९ १०७.११

कळमनुरी १९८५ ४६२० २३२.७१

वसमत १३२६४ १९७८ १४.९१

औढा नागनाथ २१२० ६३७० ३००.४७

सेनगाव ६१९६ २४९० ४०.१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Subsidy: ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान

Alephata Onion Rate: आळेफाटा येथील उपबाजारात कांदा प्रति क्विंटलला १६०० रुपये

Bhigwan Farmers Meet: ऊस-दूध परिषद शनिवारी भिगवणला : रघुनाथ पाटील

Paddy Plantation: मुसळधार पावसाचा भात लागवडीत खोडा

Mahamudra Book: ‘महामुद्रा’तील इतिहास भविष्यातील पिढीसाठी उपयुक्त : नितीन गडकरी

SCROLL FOR NEXT