Sugarcane Trash Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Trash Management : ऊस पाचट न जाळता शेतातच कुजवा

Sugarcane Trash : उसतोड झाल्यानंतर बरेच शेतकरी शेतात शील्लक राहिलेल पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळे प्रदुषण तर होतच शिवाय जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजिवाणू देखील नष्ट होतात.

Team Agrowon

Sugarcane Management : उसतोड झाल्यानंतर बरेच शेतकरी शेतात शील्लक राहिलेल पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळे प्रदुषण तर होतच शिवाय जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजिवाणू देखील नष्ट होतात. हे टाळायच असेल तर शेतात उसाच्या पाचटाचे अच्छादन करुन हे पाचट शेतातच कुजवण गरजेच आहे. शेतात पाचट अच्छादनाचे फायदे काय आहेत याविषय़ीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत. 

पीक वाढीनुसार पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, जमिनीतील कमी होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा एक चांगला उपाय आहे.  एक हेक्‍टर ऊस क्षेत्रातून सुमारे ८ ते १२ टन पाचट मिळत, त्यापासून ५ ते ६ टन सेंद्रिय खत खोडवा पिकाला मिळते.

पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणार  ४० ते ५० किलो नत्र,  २० ते ३० किलो स्फुरद आणि ७५ ते १०० किलो पोटॅश पुढील पिकास उपलब्ध होत. ऊस तोडणीनंतर ७० टक्के शेतकरी शेतात उरलेल पाचट जाळून टाकतात.  त्यामुळे केवळ ५ टक्के म्हणजे सुमारे हेक्‍टरी ५०० किलो पाचटाची राख शिल्लक राहते. तसेच मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होऊन उष्णतेने जमीन आणि त्यातील उपयुक्त जिवाणू आणि गांडुळावर परिणाम होतो. 

पाचट आच्छादनाचे फायदे काय आहेत?

ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट जाळून टाकतात, सर्व सरीच्या बगला फोडून रासायनिक खताची मात्रा देऊन पाणी दिल जात. पाणी आणि खते गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरले तर तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. उसाचे पाचट न जाळता ते एक आड एक सरीमध्ये पसराव. किंवा सर्व सरीत पाचट दाबून बसवावे.  हे पाचट शेतात आच्छादनाच काम तर करतच. याशिवाय पाचट कालांतराने कुजल्यानंतर त्यापासून पिकाला चांगल सेंद्रिय खत देखील मीळत.

पाचटाच्या आच्छादनामुळे जागेवर तण उगवत नाही. उसाला जी खते दिली जातात त्या खतांचा अपव्यय होत नाही.  तण व्यवस्थापनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते. पाचट एक आड एक सरी  किंवा सर्व सरीत ठेवल्यानंतर सर्व सरीत पाणी देण्यासाठी एक आड एक सरीस पाणी द्यावे लागते. पण एक आड एक सरीमध्ये पाचट पसरल्यामुळे पाण्याच बाष्पीभवन कमी होत. जमिनीतील ओलावा १५ ते २० दिवस टिकून राहतो. यामुळे उसाला पाण्याच्या पाळ्या देण्याच प्रमाण कमी होत. 

पाचट ठेवलेल्या सरीतील माती पाणी शोषत असल्याने पाणी दिल्यावरही लवकर वाफसा येतो. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी आणि हवेच योग्य संतुलन राहून उसाच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

शेतात गांडुळाची व उपयुक्त जिवाणूची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते आणि पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. पाचटातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात. जलसंधारण शक्तीही वाढते. त्यामुळे तुम्हीही ऊस शेती करत असाल तर ऊस तोडणीनंतर पाचट न जाळता त्याच आच्छादन करा. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT