ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : ‘उजनी’चे पाणी उतरणीला

Ujani Water Level : सध्या उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ४९४.३७० मीटरपर्यंत आहे. तर एकूण पाणीसाठा ९०.९६ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा २७.३१ टीएमसी आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाने यंदा पुणे जिल्ह्यातील पावसावर कशीबशी ६० टक्क्यांची पाणी पातळी गाठली. त्या आधारे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार शेतीसाठी दोन पाळ्या मिळतील. पण पावसाने दिलेली ओढ आणि बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीपातळी पुन्हा उतरणीला लागली आहे. ६० टक्क्यांची पाणी पातळी आता अवघ्या महिनाभरातच ५० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढच्या पाणी नियोजनावर होईल.

सध्या उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ४९४.३७० मीटरपर्यंत आहे. तर एकूण पाणीसाठा ९०.९६ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा २७.३१ टीएमसी आहे. तर या पाण्याची टक्केवारी ५०.९७ टक्क्यांवर आहे. गेल्या महिन्यात नऊ ऑक्टोबरला धरणाची पातळी ६० टक्क्यांवर होती. आता महिनाभरातच त्यात १० टक्क्यांनी घट झाली आहे.

धरणातील या उपलब्ध पाण्याचे दहा दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन करण्यात आले. त्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा आराखडा आखण्यात आला. त्यानुसार गेल्याच आठवड्यात ४ नोव्हेंबरपासून शेतीला पहिले आवर्तन सोडण्यात आले. सध्या कालव्यासह जोडकालव्यातून ३ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पहिल्या पाळीचे पाणी ४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत सोडले जाईल.

साधारण त्यासाठी आठ टीएमसी पाण्याचा वापर होईल. त्याशिवाय जानेवारीत दुसऱ्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात येईल. तसेच सोलापूरसह अन्य पाणी योजनांसाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल. १ डिसेंबर ते १० डिसेंबर कालावधीत पहिले आणि १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दुसरे अशा दोन टप्प्यात नदीतून हे पाणी सोडले जाईल.

त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या कालावधीत पाण्याचा वापर साधारण ४४.२७ टीएमसी इतका होईल. अर्थात, उपयुक्त साठ्याच्याही खाली हे पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे यंदा धरण लवकर उणे पातळीत पोहचेल. त्याशिवाय बाष्पीभवनाने काही पाणी आटेल. त्यामुळे पाण्याचे केलेले हे नियोजन कितपत आणि कसे पूर्ण होणार, याबाबत साशंकता आहे.

‘उजनी’तील पाण्याचे संभाव्य नियोजन

- शेतीचे पहिले आवर्तन ४ नोव्हेंबर १४ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार

- शेतीसाठी सोडलेले हे पाणी सलग ४० दिवस कालव्याला राहणार

- शेतीचे दुसरे आवर्तन एक जानेवारीपासून; साधारणतः: २० जानेवारीपर्यंत

- एक डिसेंबरला सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडणार, त्यानंतर प्रत्येक दोन महिन्यांतून एकदा हे पाणी

टँकरची संख्या गाठणार शंभरी

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. पण यंदा प्रत्यक्षात ३५० मिलिमीटरच्याही पुढे पावसाचा आकडा पोचलेला नाही. त्यामुळे विहिरी, बोअर यासारख्या शाश्वत स्त्रोतांची पाणीपातळी आटली आहे. आताच जिल्ह्यात आठ टॅंकर सुरु आहेत. फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत ही संख्या १०० वर पोचेल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT