Chiku Agrowon
ॲग्रो विशेष

Chiku Rate : घाऊक बाजारपेठेत चिकूच्या दरात घट

Chiku Market : शहरातील घाऊक बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिकूचे बाजारभाव कमी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी चिकू खरेदी बंद केली आहे.

Team Agrowon

Bordi News : शहरातील घाऊक बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिकूचे बाजारभाव कमी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी चिकू खरेदी बंद केली आहे. परिणामी, बागातदारांवर मोठे संकट कोसळले आहे. झाडांवर तयार झालेल्या फळांचे काय करायचे, असा प्रश्न भेडसावू लागला आहे.

सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून चिकूचा हंगाम सुरू होतो; मात्र मागच्या वर्षी मेच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात बिपोरजॉय चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यामुळे या वर्षी चिकूचा हंगाम डिसेंबरऐवजी फेब्रुवारीत सुरू झाला. उशिरा फळांची आवक सुरू झाल्यामुळे शहराच्या बाजारपेठेत सुरुवातीपासूनच मंदीचा सामना करावा लागला आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणामध्ये फळांचे बाजारभाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र या काळातही बाजारभावात फारशी सुधारणा झाली नाही.

प्रतिकिलो सात ते आठ रुपयांप्रमाणे फळे विकली गेली. त्यामुळे फळे तोडण्याचा प्रतिकिलो चार रुपये खर्च वजाजाता शेतकऱ्याला तीन ते चार रुपये प्रतिकिलो यावरच समाधान मानावे लागले होते. दरम्यानच्या काळात बाजारभाव सुधारतील, या अपेक्षेने शेतकरी बाजारात नियमितपणे फळे पाठवत असतानाच अचानक शहराच्या बाजारपेठात चिकूचे बाजारभाव प्रतिकिलो तीन ते चार रुपये असल्याच्या सूचना व्यापाऱ्यांनी दिल्यामुळे बागायतदार हतबल झाला आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील मुंबई, पुणे या बाजारपेठा वगळता चिकू फळांना उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी असते. खास करून हिवाळ्यात या फळाचा स्वाद त्या भागातील खवय्ये घेत असतात; परंतु उन्हाळ्यात उष्णता वाढल्यानंतर चिकूची फळे खाण्याकडे कल कमी होतो. त्यामुळे थोडेफार परिणाम दरवर्षी होतोच; परंतु चालू वर्षी लोकसभा निवडणूक सुरू असल्यामुळे ग्राहक कमी आहे.
प्रीत पाटील, चिकू व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT