Team Agrowon
चिकूपासून जॅम बनविण्यासाठी मध्यम परिपक्व ते पूर्ण पिकलेल्या टप्प्यामधील फळे घ्यावीत.
ही फळे पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावरील साल व बिया काढून घ्याव्यात. फळांचा गर काढून त्याचा लगदा तयार करावा.
प्रमाणकानुसार जॅममध्ये एकूण विद्राव्य घटक कमीत कमी ६८ टक्के असणे आवश्यक आहे.
त्यानुसार एक किलो चिकूच्या लगद्यासाठी अंदाजे एक किलो साखर व दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून शिजवून घ्यावे.
मिश्रण शिजवत असताना त्यास सतत ढवळत राहावे. जेणेकरून मिश्रण एकसंध शिजले जाईल.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात सोडिअम बेन्झोएट ०.४ ते ०.६ ग्रॅम हे परिरक्षक प्रति किलो जॅम या प्रमाणात थोड्या पाण्यात विरघळवून मिश्रणात टाकावे.