Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew MSP : अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजूला हमीभाव जाहीर करण्याची मागणी

Cashew Rate : अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू हमीभावासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर काजू उत्पादक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा काजू उत्पादकांनी शासनाला दिला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू हमीभावासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर काजू उत्पादक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा काजू उत्पादकांनी शासनाला दिला आहे. याशिवाय शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता-रोको आंदोलन देखील करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील काजू उत्पादकांची बैठक सोमवारी (ता. २६) झाली. या बैठकीला फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, काजू बागायतदार दिवाकर म्हावळणकर, प्रवीण परब, लक्ष्मण नाईक, बाळा गवस, आकाश नाईक, संतोष देसाई आदी उपस्थित होते.

काजूला हमीभाव मिळावा यासाठी १६ फेब्रुवारीला काजू उत्पादकांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. काजू बीला २०० रुपये हमीभाव द्यावा ही प्रमुख मागणी बागायतदारांची होती. त्या अनुषंगाने गोवा शासनाने ज्याप्रमाणे गोव्यातील काजू उत्पादकांना १५० रुपये हमीभाव देऊन दिलासा दिला त्याप्रमाणे राज्य शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी बागायतदारांची होती.

परंतु राज्य शासनाने आजमितीस कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासन काजू बी ला हमीभाव देण्यासाठी अनुकूल दिसत नाही. त्यामुळे आता अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.

त्यामुळे येत्या काही दिवसांत रास्ता-रोको (Rasta Roko) आंदोलन करण्याचा निर्णय उत्पादकांनी घेतला. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर काजू हमीभावाबाबत निर्णय झाला नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार देखील बैठकीत करण्यात आला.

(ॲग्रो विशेष)

काजूला हमीभाव मिळावा यासाठी २०१८ पासून आम्ही प्रयत्न करीत आहोत. परंतु राज्य शासनाकडून कोणताही ठोस निर्णय आजतागायत घेतलेला नाही. येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात निर्णय झाला नाही त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील १५ हजार काजू उत्पादक बहिष्कार घालतील.
- विलास सावंत, अध्यक्ष, फळबागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT