Team Agrowon
एकीकडे परिपक्व झालेल्या काजू बीच्या दरासाठी सर्वत्र आंदोलन सुरू असताना ओल्या काजूगराला चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे.
ओल्या काजूगराला शेकडा चारशे रुपये दर मिळत असून ओल्या काजू बीला आकारानुसार २५० ते ३०० रुपयांचा दर मिळत आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सध्या काजू बीच्या घसरलेल्या दरावरून आंदोलने सुरू आहेत.
परिपक्व झालेल्या काजू बीला सध्या १२६ रुपये दर दिला जात आहे. असे असले तरी ओल्या काजू बीला मात्र चांगला दर बाजारपेठेत मिळत आहे.
ओल्या काजूगराला शेकडो ३०० ते ४०० रुपये दर मिळत आहे. तर काजू बीला २५० ते ३०० रुपये दर मिळत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या विविध भागांत आहे.
ओल्या काजूगराला मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध शहरांमध्ये मोठी मागणी आहे. ओ
ओल्या काजू बीतून गर काढण्यासाठी साधारणपणे शेकडा ५० ते ६० रुपये खर्च येतो. त्यामुळे परिपक्व काजू बीपेक्षा ओला काजू विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत आहे.