APMC Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli APMC Election : माजी संचालकांच्या अपात्रतेवर सोमवारी निर्णय

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणातील नऊ माजी संचालकांच्या अपात्र ठरविल्याच्या निर्णयाविरोधात पणन संचालकांकडे गुरुवारी (ता. १३) सुनावणी पूर्ण झाली.

Team Agrowon

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या (Sangli APMC Election) रिंगणातील नऊ माजी संचालकांच्या अपात्र ठरविल्याच्या निर्णयाविरोधात पणन संचालकांकडे गुरुवारी (ता. १३) सुनावणी पूर्ण झाली.

माजी संचालक आणि तक्रारदाराच्या वतीने वकिलांनी पणन संचालक विनायक कोकरे यांच्याकडे म्हणणे मांडले. माजी संचालकांच्या अपीलावर सोमवारी (ता. १७) निर्णय दिला जाणार आहे. निर्णयाकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय लोकांचे लक्ष आहे.

बाजार समितीच्या नऊ माजी संचालकांच्या उमेदवारीवर अनिल शेगुणसे यांनी आक्षेप घेतला होता. माजी संचालकांनी गैरव्यवहार केल्याच्या ठपका चौकशी अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे.

संतोष पाटील, प्रशांत शेजाळ, वसंत गायकवाड, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, अभिजित चव्हाण, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आणि अजित बनसोडे संचालकांकडून जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.

या कारणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केली होती. बाजार समितीतील संचालकांच्या कारभारावर चौकशी अहवालातील आक्षेपामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी नऊ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविले. या निर्णयाविरोधात माजी संचालकांनी पणन संचालकांकडे अपील केले होते.

सुनावणीवेळी माजी संचालकांच्या वतीने अ‍ॅड. धरणीधर पाटील यांनी म्हणणे मांडले. बाजार समितीच्या कारभाराची चौकशी झाली आहे, मात्र अद्याप संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही.

चौकशी अहवालामध्ये संदिग्धता आहे, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड. राजेश जामदार यांनी म्हणणे मांडत बाजार समितीच्या अपहारामध्ये माजी संचालक दोषी आढळले आहेत.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य आहे. त्याप्रमाणे पणन संचालकांनीही माजी संचालकांना अपात्र करावे, असे म्हणणे मांडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Agriculture Mortgage Loan : ‘शेतीमाल तारण’साठी औसा बाजार समितीचे पहिले पाऊल

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला

8th Pay Commission: ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठवा वेतन आयोग 'या' दिवशी लागू होणार

Rabi Sowing : लातूर विभागात पंधरा लाख हेक्टवर रब्बीचा पेरा

SCROLL FOR NEXT