Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Transfers: कृषी खात्यात बदल्यांसाठी अधिकाराचे विक्रेंद्रीकरण

Administrative Reform: कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या दर्जानुसार कृषी आयुक्त, सहसंचालक, जिल्हा स्तरावरून केल्या जातील. याबाबत शासनाने गुरुवारी (ता. १७) बदल्यांबाबत धोरणात्मक आदेश जारी केला.

 गोपाल हागे

Akola News: कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या दर्जानुसार कृषी आयुक्त, सहसंचालक, जिल्हा स्तरावरून केल्या जातील. याबाबत शासनाने गुरुवारी (ता. १७) बदल्यांबाबत धोरणात्मक आदेश जारी केला. गट-अ, ब, क, ड या दर्जाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना होणारा विलंब टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रशासकीय बदल्या, मध्यान्न बदल्यांना यापूर्वी मंत्रालयस्तरावरून व्हायच्या. ही प्रक्रिया अत्यंत किचकट स्वरूपाची झाली होती. या ठिकाणी चढाओढसुद्धा व्हायची. आता नव्या स्वरूपानुसार कृषी सहसंचालकांची बदली मुख्यमंत्री स्तरावरून केली जाईल. कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची बदली कृषिमंत्री करतील. मात्र एखाद्याची मध्यान्न बदली करायची असेल तर तो अधिकार मुख्यमंत्र्यांकडे राखून ठेवण्यात आला आहे.

सामान्य राज्यसेवा गट ‘अ’ (वरिष्ठ प्रशासन अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रशासन अधिकारी) दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासकीय बदली करण्याचे अधिकार कृषी आयुक्तांकडे आले आहेत. यापैकी कुणाची मध्यान्न बदली करायची असेल तर त्याचा अधिकार कृषिमंत्र्यांकडे आहे. तसेच महाराष्ट्र कृषी सेवा गट ‘ब’ (तालुका कृषी अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, स्वीय सहायक) यांची बदली कृषी आयुक्त करतील.

येथील मध्यान्न बदली कृषिमंत्री करू शकतील. कृषी सेवा गट ‘ब’ (कनिष्ठ) या बाबतीतही हाच निकष लागू राहील. तर गट ‘क’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या विभागीय कृषी सहसंचालक स्तरावरून होतील. या गटातील कुणाची बदली मध्यान्न होत असेल, तर तो अधिकार कृषी आयुक्तांकडे आहे.

गट ‘ड’च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत प्रशासकीय बदल्यांचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आहेत. मध्यान्न बदली विभागीय कृषी सहसंचालक करू शकतील. तर गट ‘ड’मधील कर्मचाऱ्यांची बदली विभागांतर्गत करायची असेल तर ती विभागीय कृषी सहसंचालक स्तरावरून केली जाईल. मध्यान्न बदलीचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले.

बदल्या सुकर व्हाव्यात...

यापूर्वी कृषी खात्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या मंत्रालय स्तरावरून केल्या जायच्या. यामध्ये विलंब होत होता. परिणामी, या प्रक्रियेवर टीकासुद्धा झाली होती. मंत्रालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या, मध्यस्थांचे अडथळे हे सर्व वेळखाऊ आणि खर्चिक झाले होते. आता बदल्या कृषी आयुक्त व सहसंचालक स्तरावरून होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

विक्रेंद्रीकरणामुळे मुंबईच्या ‘वाऱ्या’ बंद होतील. मात्र कृषी आयुक्तालय, सहसंचालकस्तरावर ‘फेऱ्या’ माराव्या लागतील का, असा प्रश्‍नही ‘कृषी’तील अधिकारी, कर्मचारी विचारत आहेत. नवीन कृषी आयुक्त यात निश्‍चितच काही तरी सक्षमपणे भूमिका घेतील, असेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT