Agriculture Department: कृषी विभागाला प्रथमच मिळणार कामाचे वेळापत्रक

Office Work Timetable: राज्यातील कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांनी वार्षिक नियोजन करावे व तसेच कार्यालयीन कामे मासिक वेळापत्रकानुसार करावीत, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांनी वार्षिक नियोजन करावे व तसेच कार्यालयीन कामे मासिक वेळापत्रकानुसार करावीत, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे कृषी आयुक्तांनी स्वतःदेखील आपल्या कामाचे वार्षिक वेळापत्रक तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कृषी सहायकांपासून ते विभागीय कृषी सहसंचालकांपर्यंत विविध अधिकारी व कर्मचारी राज्याच्या क्षेत्रिय पातळीवर सध्या काम करतात. परंतु, कोणाच्याही कामाचे नियोजन ठरलेले नसते. कृषी आयुक्तालयातून सूचना आल्यानंतर सहसंचालकांची धावपळ होत असते. जिल्हाधिकाऱ्यांशी संलग्न बैठका जवळ आल्या की जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पळापळ करतात.

Agriculture Department
Agriculture Department Task Force : निविष्ठांच्या काळा बाजारावर ‘वॉच’

जिल्हा अधीक्षकांनी काम सांगितल्यानंतरच अनेकदा तालुका कृषी अधिकारी कार्यालये हलतात. शेवटी तालुक्याच्या कार्यालयांकडून सांगितलेल्या कामानुसार क्षेत्रिय कर्मचारी जमेल तशी कामे करतात. परंतु, या साखळीत सध्या कोणाकडेही कामाचे वेळापत्रक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक सेवा देण्याचे ध्येय साध्य होत नाही, असे आस्थापना विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

एका विभागीय कृषी सहसंचालकाच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठांनी सांगितले तरच हालचाली करण्याची सवय कृषी खात्याच्या सर्व कार्यालयांमध्ये सध्या सुरू आहे. मात्र, स्वतःहून कोणत्याही कार्यालयाने कामाचे नियोजन केलेले नाही. त्यामुळेच कृषी आयुक्तांनी महिनानिहाय कामकाज वेळापत्रक तयार करण्याचा आग्रह धरला आहे.

Agriculture Department
Agriculture Department: दुभत्या गायीला कृषिमंत्र्यांचा नकार

कृषी आयुक्त सूरज मांढरे पूर्वी शिक्षण आयुक्त होते. शिक्षण आयुक्तालयाने स्वतःची दिशादर्शिका तयार केली आहे. त्याच धर्तीवर कृषी आयुक्तालयाने वेळापत्रक तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही जबाबदारी कशी पार पाडावी यासाठी अधिकाऱ्यांचा एक अभ्यास गटदेखील तयार करण्यात आला होता. या संदर्भात काही प्रशासकीय नियमावली लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.”

कृषी विभागाचे कामकाज मुख्य परिणाम क्षेत्रे (केआरए) आणि मुख्य कामगिरी सूचक (केपीआय) पद्धतीने होणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बहुतांश वेळ तातडीच्या कामांची पूर्तता करण्यात जातो. त्यामुळे अनेकदा महत्त्वाची कामे मागे पडतात. त्यामुळे आम्ही केआरए विचारात घेऊन वर्षभरात नेमक्या कोणत्या दिशेने कामकाज करायचे या विषयीचा आराखड्याला महत्त्व देणार आहोत. या आराखड्याच्या साध्यपूर्तीसाठी दररोज करायच्या कामांचे दिशादर्शन करणारी कृषी दिशादर्शिकादेखील तयार होत आहे.
सूरज मांढरे, कृषी आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com