Onion Lasalgaon Market agrowon
ॲग्रो विशेष

Onion Lasalgaon Market : कांदा दरातील घसरणीमुळे लासलगाव बाजारात सौदे पाडले बंद; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

Onion Prices : कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Lasalgaon Kanda market : नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे सोमवार (ता. १३) लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आले आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून आम्ही करत आहोत. कांदा दरातील घसरण बघता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे बाजार समितीत सुरू असलेला कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. अशी माहिती राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील बाजारसमितीत कांद्याचे दर पडले

मागच्या २४ तासांत नाशिक जिल्ह्यात ८३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. तर राज्यातील बाजार समितीमध्ये (ता.१२) सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ लाख ७६ हजार २३१ क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी १ हजार २०० रुपयांपासून ते २ हजार ३०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत आहे. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, सोलापूर बाजारात लाल कांद्याला १ हजार ४०० रुपये, येवला बाजारात १ हजार ६५० रुपये आणि लासलगाव बाजारात केवळ १ हजार ७८० रुपये असा सरासरी दर मिळाला.

बांगलादेशी कांद्याची लागवड वाढली

बांगलादेशमध्ये कांद्याची लागवड क्षेत्रात सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहे. याचा थेट परिणाम भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. कारण बांगलादेश हा भारतीय कांद्याचा मोठा आयातदार आहे. आता तिथे कांद्याची लागवड वाढल्याने आयात कमी होईल, ज्यामुळे भारतात भाव आणखी घसरण्याचा शक्यता आहे.

सरकारची बघ्याची भूमिका

राज्यातील अनेक बाजारसमितीत कवडीमोल भावाने कांद्याचे लिलाव होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. कांदा दरातील होणारी घसरण थांबवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी आणि निर्यातदार करत आहेत. मात्र, सरकारने यावर कोणतीही ठोस पाऊले उचलली नसल्याने सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT