
Kolhapur Market Yard : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व खातेप्रमुखांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नियमानुसार बाजारसमितीतल सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या ठिकाणी बदल्या स्विकारल्या आहेत. मात्र, समितीत सर्वाधिक लाभ मिळणाऱ्या विभागाच्या एकाच अधिकाऱ्याने बदली टाळण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याच मार्गावर पुढे जात अन्य तीन विभाग प्रमुखांनी बदलीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
यावर बाजार समितीतील बदली थांबविण्यासाठी राजकीय नेते व मंत्र्यांच्या निरोपाचे वजन वापरले जात आहे. यामुळे बाजार समितीमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
याबाबत बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील म्हणाले की, "नियमानुसार व गरजेनुसार बदल्या केल्या आहेत. सर्वांनी बदल्या स्वीकारलेल्या आहेत. एखाद्या कोणाची नाराजी असू शकेल, त्यावर मार्ग निघेल". अशी माहिती पाटील यांनी दिली.
बाजार समितीत दर तीन वर्षांनी बदल्या होतात. या बदल्या बाजार समितीच्या कार्यालयात कोल्हापूर शाहू मार्केट यार्डात, लक्ष्मीपुरी, मलकापूर एवढ्या मर्यादित क्षेत्रात असतात. मात्र, एकाच खात्यात वर्षानुवर्षे राहिल्यानंतर संबंधित व्यक्तीला कामकाजाचे बारकावे समजलेले असतात. काही मोजक्या खात्यात काही लाभ उठवण्याचे मार्गही हाताळले जातात.
मात्र, अचानक बदली झाल्यामुळे नवीन खात्यात गेल्यानंतर तिथे काहीच करता येत नसल्याने मोजक्या वर्गाची नाराजी आहे. अशा स्थितीत कर्मचारी पातळीवर बहुतेकांनी या बदल्या स्वीकारल्या आहेते. हिशेब विभागाच्या एका अधिकाऱ्यांना मात्र बदलीचे आदेश निघूनही त्यांनी त्याला दाद दिलेली नाही. यात ते अधिकारी वारणा खोऱ्यातील एका नेत्याच्या जवळचे असल्याने त्यांच्या बदलीसाठी फारसा कोणी जोर लावत नाही.
तर संचालक मंडळातील काही संचालक त्याच वारणा खोऱ्यातील नेत्यांच्या गटातील आहेत. त्यामुळे एक गट त्यांची बदली करा तर दुसरा गट बदली करू नका, यासाठी प्रयत्नशील आहे. ही बाब सभापतींसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.