Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत

Kharif Season Crop Loan Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामात वाटप झालेल्या कर्जाचे पुनर्गठन करून परतफेडीसाठी सवलत दिली जात आहे.

Team Agrowon

Solapur News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामात वाटप झालेल्या कर्जाचे पुनर्गठन करून परतफेडीसाठी सवलत दिली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासंबंधीची अधिसूचनाही काढली आहे, त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. या पुनर्गठनासाठी आता ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून पीककर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंकेने केले आहे.

खरीप हंगामात गतवर्षी खरिपात जिल्ह्यातील बॅंकांनी एक लाख २७ हजार ८२० शेतकऱ्यांना दोन हजार ९० कोटींचे पीककर्ज वितरित केले होते. त्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर होती, पण कर्ज पुनर्गठनासाठी जिल्हा बॅंकेकडे आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने अर्ज केला नसल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, नेमक्या किती शेतकऱ्यांचे पुनर्गठन झाले, याची आकडेवारी कोणत्याच बॅंकेने खुद्द जिल्हा अग्रणी बॅंकेला दिलेली नाही. त्यामुळे या सवलतीचा लाभ नक्की शेतकऱ्यांना मिळाला का, या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

शासनाच्या आदेशानुसार दुष्काळामुळे पीककर्जाची परतफेड करणे अशक्य असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बॅंकेशी संपर्क साधून थकित कर्जाचे पुनर्गठन करून घ्यावे. जेणेकरून थकीत कर्जाचे पुनर्गठन होईल आणि नवीन कर्जही मिळू शकेल. पुनर्गठनाची ही सवलत खरीप हंगाम २०२३ मधील कर्जासाठीच असणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पुनर्गठन नको आहे, त्यांच्याकडूनही बॅंकेने लेखी घ्यावे, अशा सूचना सर्वांना केल्या आहेत.
राम वाखरडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

Fertilizer Dealers Protest: विदर्भात कृषी विक्रेत्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद

Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Summer Livestock Health Safety: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Chana Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ९५ हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT