Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Level : नऊ धरणांत मृतसाठा

Water Crisis : येत्या काळात धरणातील पाण्याची मागणी आणखी वाढेल. त्यामुळे पाणीपातळी आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.

Team Agrowon

Pune News : गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. धरणांतील पाण्याची मागणी वेगाने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टेमघर, कासारसाई, वडिवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, विसापूर, उजनी, वडज ही धरणे मृतसाठ्यात गेली आहेत. येत्या काळात धरणातील पाण्याची मागणी आणखी वाढेल. त्यामुळे पाणीपातळी आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या महिन्यापासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती.

त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा ६८.६६ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या काळात तो एकूण ११७.४५ टीएमसी होता.

उन्हाळी हंगामामुळे शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. यामुळे खडकवासला, नीरा देवघर, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, घोड या धरणातून डाव्या आणि उजव्या अशा कालव्याला पाणी सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील चार धरणांत अवघा १४.८१ टीएमसी म्हणजेच ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये २२.२१ टीएमसी म्हणजेच ४५ टक्के पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्ये १५.१२ टीएमसी म्हणजेच ४२ टक्के पाणीसाठा आहे.

धरणातील पाणीसाठा (टीएमसी)

टेमघर ०.३७, वरसगाव ७.५०, पानशेत ५.९२, खडकवासला १.०३, पवना ४.४३, कासारसाई ०.३५, कळमोडी १.४३, चासकमान ३.०४, भामा आसखेड ४.२६, आंध्रा १.८१, वडिवळे ०.७२, शेटफळ ०.१३, गुंजवणी २.०६, भाटघर ११.१९, नीरा देवघर ४.५०, वीर ४.४६, पिंपळगाव जोगे १.५५, माणिकडोह २.७०, येडगाव १.३६, वडज ०.५९, डिंभे ६.३७, चिल्हेवाडी ०.३१, घोड २.२५, विसापूर ०.३३, उजनी उणे ९.९९, मुळशी १०.५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT