Agriculture Irrigation : सांगली, साताऱ्यासाठी ४ महिन्यांत ‘कोयना’तून १५ टीएमसी पाणी

Koyna Water Storage : चार महिन्यांत १५.१३ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
Koyna Dam
Koyna DamAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली आणि सातारा जिल्ह्यांत पाणीटंचाईमुळे शेतकरी मेटाकूटीला आले आहेत. त्यामुळे कोयना धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी चार महिन्यांत १५.१३ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सातत्याने कृष्णा नदी कोरडी पडत असल्याने सिंचन योजना सुरू ठेवण्यात अडथळे येतच आहेत.

यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने ऑक्टोबरपासून पाणीटंचाई सुरू झाली. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोयजना धरणातून पाणी सोडण्यासाठी नियोजन केले. त्यानुसार ऑक्टोबरपासून कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली.

Koyna Dam
Corruption of Irrigation Scheme : पंतप्रधान पॅकेजसह सिंचन योजनांना भ्रष्टाचाराची वाळवी

त्यामुळे टेंभू, ताकारी या सिंचन योजना सुरू करून रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू झाले. टेंभूचे पहिले आवर्तन डिसेंबरमध्ये सुरू झाले तर ताकारीचे पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. टेंभूचे पहिलेच आवर्तन सुरू असून ताकारीचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे.

मात्र, सातत्याने यामध्ये राजकारण येऊ लागल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी अधिक होऊ लागला. त्यामुळे कृष्णा नदी सातत्याने कोरडी पडत होती. त्यामुळे ताकारी सिंचन योजना दोन वेळा कृष्णा नदीत पुरेसे पाणी नसल्याने बंद करावी लागली होती.

दरम्यान, कोयना धरणातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सरू होता. पण पाणी कमी पत असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विमोचकद्वारे ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने विमोचकद्वारातून ५०० क्युसेक वाढवून तो १००० क्युसेक करावा यासाठी पत्र व्यवहार केला.

Koyna Dam
Irrigation Project : जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेला मंजुरी

त्यानुसार विमोचकाद्वारे पाण्याचा १००० क्युसेक विसर्ग सुरू केला. धरणाच्या पायथा विद्युत गृहाच्या दोन्ही युनिटद्वारे २१०० क्युसेक आणि विमोचकद्वारातून १००० क्युसेक असा ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी कोयना धरणातून चार महिन्यांत १५.१३ टीएमसी पाणी सोडले आहे. तर म्हैसाळ योजनेसाठी वारणा धरणातून ३.२५ टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे.

सांगली जिल्ह्यासाठी कोयना व वारणा धरणांतून पाणी सोडले जात आहे. या दोन्ही धरणांतून उपलब्ध पाण्याद्वारे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजना व कृष्णा नदीवरील ७ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सिंचन व बिगर सिंचनासाठी वापरले जात आहे. कोयना धरणातून आजअखेर १५.१३ टीएमसी पाणी सोडले असले तरी, सातत्याने कृष्णा नदी कोरडी पडत असल्याने सिंचन व बिगर सिंचन योजना चालवण्यातील अडचणी दूर झाल्याच नाहीत.

धरणांत पाणीसाठा (टीएमसी)

धरण प्रकल्पिय पाणीसाठा मृत पाणीसाठा २६ फेब्रुवारीपर्यंतचा पाणीसाठा

कोयना १०५.२५ ५.३२ ६५.६६

वारणा ३४.४० ६.८८ २२.७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com