Solapur District Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur District Bank : ‘डीसीसी’च्या ‘ओटीसीएस’ला जूनपर्यंत मुदतवाढ

Solapur District Central Cooperative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकरी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कर्जमुक्त करून नव्याने कर्ज देण्यासाठी एक रकमी परतफेड योजना राबविण्यात आली होती.

Team Agrowon

Solapur Bank News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकरी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कर्जमुक्त करून नव्याने कर्ज देण्यासाठी एक रकमी परतफेड योजना राबविण्यात आली होती.

या योजनेला ३० जून २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय आज बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली.

यावेळी विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके, माजी आमदार धनाजी साठे यांच्यासह जिल्हा बँकेचे सभासद, अधिकारी उपस्थित होते. २१ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत थकबाकीदारांसाठी एक रकमी परतफेड योजना राबविण्याचा निर्णय झाला.

ही योजनेला ८ मार्च २०२३ पासून गती मिळाली. अवघ्या २४ दिवसांमध्ये ३१ मार्च २०२३ पर्यंत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेचा लाभ घेत ३ हजार ९७१ थकबाकीदार सभासदांकडून वसूलपात्र असलेल्या १०० कोटी १८ लाखांपैकी ८१ कोटी ५८ लाख रुपये वसूल झाले आहेत.

या योजनेमुळे जिल्हा बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत ९.९८ टक्के वाढ झाली. या योजनेसाठी पात्र असलेल्या २८ हजार ३९ सभासदांपैकी २४ हजार ६८ सभासद या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत.

या योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकीदार या योजनेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस, गारपीट, पीकांना योग्य भाव नसल्याने व इतर कारणास्तव शेतकऱ्यांना ओटीएस योजनेत सहभागी होता आले नाही.

जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे बिल अद्यापही शेतकऱ्यांना दिलेले नाही. ३० जूनपर्यंत उसाची बिले मिळण्याचा अंदाज आहे.

या सर्व बाबी विचारात घेऊन जिल्हा बँकेच्या एकरकमी परतफेड योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

Pearl Farming : शिंपल्याच्या शेतीतून मोतीनिर्मिती

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटेंची अजित पवारांकडून खरपट्टी; कृषिमंत्र्यांनी मागितली माफी

Silk Farming : रेशीम उद्योगाने वाचविली तोट्यातील शेती

SCROLL FOR NEXT