Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean : अकोल्यात शेंगाच विनाच सोयाबीन, शेतकरी हवालदील; तालुक्यात बोरगाव मंजू परिसरासह बाळापूरात सारखेच चित्र

Akola News: अकोला तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला शेंगाच आलेल्या नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : अकोल्यात यंदा सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. येथे सोयाबीनची फुलांची गळतीसह इतर रोगांमुळे पिकाला शेंगाच आलेल्या नाहीत. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक देत कृषी विभागाला निवेदन दिले आहे. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले. त्यातच आता काही दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाला जबर फटका बसला आहे. पिकाची चांगली वाढ होऊन सोयाबीन शेतकऱ्यांच्या छातीपर्यंत वाढले आहे. मात्र या पिकास शेंगाच लागलेल्या नाहीत. तर काही ठिकाणी शेंगाचे प्रमाण अत्यल्प आहे.

नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदक करावी

तालुक्यात सध्या असे चित्र बोरगाव मंजू, वाशिंबा, सोनाळा, वणीसह, डोंगरगाव, बाभूळगाव, सिसा, सिसा उदेगाव आणि मासा गावात आहे. या गावात दरवर्षी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा देखील पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. तसेच सोयाबीनदेखील जोमात आले आहे. पण सततच्या पावसामुळे फुळे गळाली आहेत. पिकावर खोड आळीसह रोंगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. बोरगाव मंजू महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी शासनाने सध्य स्थितीचा दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदक करावी, अशी मागणी केली आहे.

नुकसान भरपाईसाठी निवेदन

तर डोंगरगाव, बाभूळगाव, सिसा, सिसा उदेगाव आणि मासा गावातील शेतकऱ्यांनी थेट पंचायत समितीत जाऊन कृषी विभागाला याची माहिती दिली आहे. तसेच नुकसान भरपाई मिळावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

तालुक्यात अतिवृष्टीने अतिनुकसान

जून-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यात ६०० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते. त्यात आता सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाची भर पडली आहे. पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोला तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर आणि उडीद पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT