Soybean : महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता; कृषिमंत्री मुंडे यांची माहिती

Soybean Buying Center : केंद्र सरकारने यंदाच्या हंगामातील सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीला यश आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
Agriculture Minister Dhananjay Munde
Agriculture Minister Dhananjay MundeAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सोयाबीन व उडीद ही दोन पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी कृषिमंत्री धनंजय मुंडे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती मुंडे यांनी समाजमाध्यम 'एक्स' वर रविवारी (ता.८) दिली.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान परळी येथील कृषी महोत्सवात आले असताना मुंडे यांनी सोयाबीन आणि उडीद खरेदीसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

यावेळी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावी. सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान ५० डॉलर इतके अनुदान द्यावे, याबाबत देखील केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली आहे. यावर देखील सकारात्मक निर्णय होणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळेस, अशा भावना मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Agriculture Minister Dhananjay Munde
Soybean MSP : सोयाबीनच्या हमीभावात पाच, तुरीत दहा टक्के वाढ शक्य

तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणारा हा निर्णय असून याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार! मानत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारचे अनुदान

मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष होता. यानंतर राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी राज्य सरकारने ४२०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com