Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Orange Damage : विदर्भात गारपिटीमुळे संत्रा बागेचे नुकसान

Unseasonal Rain : अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्याला गुरुवारी (ता.१५) संध्याकाळी पुन्हा गारपीट, पावसाचा फटका बसला. यामुळे गहू, भाजीपाला, संत्रा उत्पादकांचे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे.

Team Agrowon

Nagpur News : अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्याला गुरुवारी (ता.१५) संध्याकाळी पुन्हा गारपीट, पावसाचा फटका बसला. यामुळे गहू, भाजीपाला, संत्रा उत्पादकांचे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे.

नागपूर जिल्ह्यातील आग्रा, पिंपळा (केवळराम), मोहगाव (भदाडे), शेंबडा, पिंपळा (कोठा), सिंदी, उमरी, मसोरा, जुनोना (फुके), मन्नाथ (खेडी), गोवार गोंदी, खापरी व लगतच्या अनेक गावांमध्ये संध्याकाळी झालेल्या गारपिटीमुळे संत्रा फळांची गळ झाली. त्यासोबतच गहू, हरभरा लोळला आहे.

आठवड्यात दोनदा पाऊस, गारपीट झाल्याने शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी आहे. केळवद परिसरात गारपिटीमुळे गव्हाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाला मनोहर कुंभारे, गोविंदा ठाकरे, अरुणा शिंदे, सरपंच सोनू रावसाहेब, बाजार समिती सभापती रवींद्र चिखले, सरपंच प्रवीण झाडे, तालुका कृषी अधिकारी शुभांगी राठोड यांनी भेट देत पाहणी केली.

वर्धा जिल्ह्यातही पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झाले. कारंजा घाडगे व आष्टी तालुक्‍याला याचा सर्वाधिक फटका बसला. गवंडी, पिंपरी, धावसा, येनगाव, मोर्शी, खरसखांडा, हेटीकुंडी, भालेवाडी, जुनापाणी, कारंजा, वाघोडा, नारा, सेलगाव, सावल, बोरगाव (ढोले), धावडी (खुर्द), धावडी (बु.), लिंगामांडवी, दाभा यांसह अनेक गावांमध्ये नुकसान झाले. या नुकसानीची दखल घेत आमदार दादाराव केचे यांनी नुकसानग्रस्त भागात भेट दिली.

अमरावी जिल्ह्यात संत्रा बागांचे नुकसान

अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्‍यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या भागात गारपीट, पावसाची नोंद झाली. यामुळे मृग तसेच आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाची मोडतोड झाल्याची माहिती असून, या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT