Onion Nursery  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Nursery Damage : खानदेशात कांदा रोपवाटिकांचे नुकसान

Pre-Monsoon Rain : खानदेशात वळवाच्या पावसाने विविध पिकांसह कांदा रोपवाटिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात वळवाच्या पावसाने विविध पिकांसह कांदा रोपवाटिकांचेदेखील नुकसान झाले आहे. यामुळे कांदा लागवडीसंबंधी पुढे अडचणी येतील, अशी स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागील १० ते १२ दिवसात कांदा रोपवाटिका तयार केल्या आहेत.

या रोपवाटिकांत बीजांकुरण झाले होते. अशातच पाऊस आल्याने अंकुरांचे नुकसान झाले आहे. रोपांची तूट तयार झाली असून, फवारणी घेऊनही उपयोग नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खानदेशात खरिपातील कांदा लागवड दरवर्षी सहा ते आठ हजार हेक्टरवर केली जाते. सर्वाधिक चार हजार हेक्टर एवढी लागवड धुळे जिल्ह्यात असते. या लागवडीसाठी कमाल शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांत कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी मेच्या अखेरीस रोपवाटिकांत बियांची पेरणी केली होती. तर अनेक शेतकऱ्यांनी मागील आठवड्यात रोपवाटिकांत बियांची पेरणी केली.

या रोपवाटिकांत शेतकऱ्यांनी पाट पद्धतीने तसेच ठिबक, तुषार सिंचन प्रणालीच्या मदतीने सिंचन केले. रोपवाटिकांत चांगला वाफसा होता. अशातच वळवाचा पाऊस व उष्णता अशी स्थिती आहे. यामुळे बुरशीजन्य व इतर समस्या तयार झाल्या. यात मागील पाच ते सहा दिवसात विविध भागात वळवाचा पाऊस आला.

धुळे, नंदुरबार, जळगावातील चोपडा, यावल, एरंडोल, चाळीसगाव आदी भागात पाऊस झाला असून, याचा फटका कांदा रोपवाटिकांना बसला आहे. यात काळ्या कसदार जमिनीतील कांदा रोपवाटिकांतील कोवळ्या अंकुरांची हानी झाली आहे.

रोपवाटिकांत रोपांची तूट दिसू लागली आहे. तसेच तणही झपाट्याने वाढले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण ही तूट आता भरून काढणे शक्य नाही. नव्याने रोपवाटिका तयार केल्यास पुढे लागवडीला विलंब होईल.

यातच यंदाही कांद्याची लागवड अपेक्षित क्षेत्रात होणार नाही. कारण अनेक शेतकऱ्यांनी यंदाही कमी रोपवाटिका तयार केल्या होत्या. बियाणे हवे तसे व हवे ते बाजारात मिळत नाही. यंदाची लागवड पाच ते सहा हजार हेक्टरवर होईल. लागवड या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये सुरू होईल, असे संकेत आहेत.

लागवडीवर होणार परिणाम

कांदा रोपवाटिका जेथे असतात, त्या भागात पाऊस येत आहे. त्याचे प्रमाण कमी व अधिक आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात वादळासह पाऊस येत आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यातही सलग तीन दिवस काही भागात चांगला पाऊस झाला. काही भागात हलका पाऊस आहे.

यामुळे खानदेशातील मुख्य क्षेत्रातील कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना इतरत्र रोप उपलब्ध होणार नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे रोपांच्या उपलब्धतेनुसार नियोजन करावे लागणार असून, लागवड कमी होईल, असे दिसत आहे. तसेच रोपांचे दरही पुढे वधारतील. यामुळे महागडी रोपे घेऊन लागवड पूर्ण करून घ्यावी लागेल, असे चित्र खानदेशात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT