Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अतिवृष्टीने सिंधुदुर्गातील ८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : जिल्ह्यात २२ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला. काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. नदीनाल्यांना पुरस्थिती निर्माण झाली होती.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात दोन दिवस झालेली अतिवृष्टी आणि काही भागात झालेला ढगफुटीसदृश्य पाऊस यामुळे जिल्ह्यातील ३५ गावांतील १६५ शेतकऱ्यांचे ८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान भातपिकांचे झाले असुन यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात २२ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला. काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. नदीनाल्यांना पुरस्थिती निर्माण झाली होती. नदीमधील दगडमाती नदीकाठच्या पिकांमध्ये वाहुन गेल्याचे चित्र अनेक गावांमध्ये होते.

तर काही ठिकाणी भातपीक जमीनीवर आडवी झाली आहेत. तर काही भागात फळपिकांना देखील अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कृषी विभागाकडुन आता नुकसानीच्या पंचनाम्याना सुरूवात करण्यात आली आहे.

आतापर्यंत अतिवृष्टीने ३५ गावातील १६५ शेतकऱ्यांच्या ७९.९० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र भातपिकाचे आहे. या नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण, सावंतवाडी आणि दोडामार्गात अधिकत्तर नुकसान झाले असुन वेंगुर्ले आणि देवगड तालुक्यात नुकसान झाल्याची नोंद अद्याप झालेली नाही.

सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी

जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याचे चित्र आहे. दुपारनतंर काही भागात उघडीप देखील दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT