Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : वादळी वारे, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

Crop Damage : लातूर जिल्ह्यातील निलंगा व जळकोट तालुक्यातील काही भागांत गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्ह्यातील निलंगा व जळकोट तालुक्यातील काही भागांत गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान रविवारी (ता. १८) जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते. जळकोट तालुक्यातील केकत शिंदगी, होकर्णा, वडगाव आदी भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलोऱ्यात आलेली पिके मातीत मिसळली आहेत.

वडगाव येथील पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर बनसोडे यांनी हनुमान मंदिरात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. पावसामुळे पिकांचे व रस्त्यांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आठ ते नऊ गावांमध्ये साडेतीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस व मूग आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे तालुका कृषी अधिकारी पवार यांनी व्यक्त केला. त्यानंतर बनसोडे यांनी दूरध्वनीद्वारे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. रविवारी प्रत्यक्ष पाहणी करताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसान पंचनाम्याचा अहवाल त्वरित शासनाला सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निलंगा तालुक्यातही फटका

निलंगा तालुक्यातील हाडगा, वडगाव, शिवणी कोतल व सिंदी जवळगा या चार गावातील पिकांना गुरुवारी (ता. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला. या परिसरातील दोनशेहून अधिक झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडली असून विजेचा खांब व हजारो हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले. उसाचे पीक आडवे झाले असून आंब्याच्या बागांनाही झळ बसली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागले. पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT