Heavy Rain Damage : अतिवृष्टीने भोरमध्ये ८०, तर मुळशीत ६० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

Crop Damage : कोळवण (ता.मुळशी) जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने भोर तालुक्यातील सुमारे ८०, तर कोळवण (ता.मुळशी) खोऱ्यातील ६० हेक्टर क्षेत्रांवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोळवण (ता.मुळशी) जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने भोर तालुक्यातील सुमारे ८०, तर कोळवण (ता.मुळशी) खोऱ्यातील ६० हेक्टर क्षेत्रांवरील शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे नजर अंदाज पंचनामे पूर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पूर्ण पंचनामे होतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड आणि कोळवणचे कृषी सहाय्यक शेखर विरणक यांनी दिली.

भोर तालुक्यातील नसरापूर, भोर एक व भोर दोन अशा तीनही कृषी मंडलांत कृषी कर्मचारी व महसूल विभागाचे तलाठी यांच्या वतीने अतिवृष्टीचे पंचनामे चालू असून जुलै महिन्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ३१ जुलैअखेर पर्यंतचे पंचनामे करण्यात आले आहेत.

Crop Damage
Crop Damage Compensation : ‘एनडीव्हीआय’प्रमाणे भरपाई २०२५ पासून

यामध्ये तालुक्यातील तीनही मंडलांमध्ये मिळून बांध वाहणे, ताल फुटणे, शेतातील माती वाहून जाणे आदी शेतीचे ८० हेक्टर क्षेत्रावरील ३८१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर, पिकांमध्ये प्रमुख पीक भात, नाचणी, वरई या पिकांचे सुमारे ७१ हेक्टर क्षेत्रातील १५७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीत पिके वाहून जाणे, गाडून जाणे, शेतात दगडांचा खच पडल्याने संपूर्ण पीक त्या खाली झाकणे अशा प्रकारे नुकसान झाले आहे.

कोळवण खोऱ्यात ६० हेक्टरचे नुकसान

अतिवृष्टीत कोळवण खोऱ्यातील भातपिकांचे सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची शक्यता कृषी सहायक शेखर विरणक यांनी दिली. ८० टक्के भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अतिवृष्टीने डोंगरातील पाण्याच्या प्रवाहासोबत दगड-गोटे गाळमिश्रित माती ही काही थेट शेतकऱ्यांच्या भातशेतात गेली.

Crop Damage
Flood Crop Damage : पुराच्या पाण्याने कोट्यवधींचे नुकसान

यामुळे पुनर्लागवड केलेली भातशेती गाडली गेली. काही शेताचे बांध तुटले व बांधाखालची भातशेती गाडली गेली. नदीच्या कडेस असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या भातशेतीत नदीचे पाणी पात्र सोडून वाहिल्यामुळे त्याही भातशेतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

सतत होणाऱ्या पावसाने सखल भागातील भातशेतात पाणी हे साचून राहिलेले असल्यामुळे भात पिके कुजली आहेत. शासन स्तरावर संबंधित नुकसान ग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश आल्यावर मंडलकृषी अधिकारी एच. एम. कुलकर्णी, मंडलाधिकारी बलभीम पाटील, यांनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामे करण्यासाठी मदत केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com