Analog Paneer Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Paneer: अॅनालॉग पनीरमुळे डेअरी उद्योग त्रस्त

Dairy Industry Crisis: राज्यात मोठ्या प्रमाणावर अॅनालॉग पनीरची विक्री होत असून, यामुळे डेअरी उद्योग अडचणीत आला आहे. दूध उत्पादक संघटनांनी अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांकडे या पनीरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्यात रोज लाखो रुपयांचे नकली अॅनालॉग पनीर विकले जात असून त्यामुळे दुधापासून पनीन तयार डेअरी उद्योग त्रस्त झाला आहे. अॅनालॉग पनीरवर तातडीने बंदी आणावी, असे साकडे राज्य सरकारला घातले आहे.

राज्याच्या डेअरी उद्योगाचे प्रतिनित्व करणाऱ्या ‘दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने अलीकडेच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. ‘पनीर, खवा, दूध, तूप यातील भेसळ रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच अॅनालॉग पनीरवर आणावी, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. या वेळी अन्न व औषध आयुक्त राजेश नार्वेकर, संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तुपात पामतेलाची भेसळ

राज्यातील दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ वाढली आहे. तुपात देखील पाम तेलाची भेसळ होत असून शासकीय यंत्रणा कारवाई करते आहे. परंतु कारवाईची व्याप्ती वाढवायला हवी. छापा टाकून अॅनालॉग पनीर पकडल्यानंतर संबंधित व्यावसायिकाचे नाव जाहीर करायला हवे. नकली पनीरची विक्री वाढल्यामुळे दुधापासून बनविलेल्या पनीर विक्रीत अडथळे तयार झालेले आहेत. त्यामुळेच गुटखा बंदीसारखीच अॅनालॉग पनीरवर राज्यात कायमची बंदी घालणे योग्य ठरले, असा आग्रह आम्ही अन्न व औषध मंत्रालयाकडे धरला आहे, अशी माहिती डेअरी उद्योग सूत्राने दिली.

बल्क मिल्क कूलर तपासा

दूध भेसळ खरोखर रोखायची असल्यास आता शासकीय यंत्रणेला थेट गावपातळीवरील बल्क मिल्क कुलरपर्यंत धडक देत तपासणी करायला हवी. दुधामध्ये कमी प्रतिची भुकटी तसेच पशुखाद्य आहारातदेखील नकली पदार्थांची भेसळ होत असल्यामुळे दुधाची पातळी खालावली आहे. दुधाचा दर्जा घसरल्यामुळे राज्यात ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्‍न तयार झाला आहे, असेही डेअरी उद्योगाचे म्हणणे आहे.

दुधाविना बनते अॅनालॉग पनीर

दुधापासून पनीर बनते. मात्र अॅनालॉग पनीर बनविण्यासाठी दुधाची गरज नसते. पाम तेल, स्टार्च आणि इतर रसायने टाकून अॅनालॉग पनीरची निर्मिती केली जाते. त्याची किंमत कमी असल्यामुळे खाद्यपदार्थ विक्री केंद्रे किंवा उपहारगृहांमधून या पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Relief: राज्यात नुकसानीपोटी ३३७ कोटींची मदत

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

SCROLL FOR NEXT