Vidarbh Dairy Industry : विदर्भात दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी

Milk Production : विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे सोडले, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची संधी निर्माण झाली आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे सोडले, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची संधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. १६) केले.

मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा प्रारंभ तसेच धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या कामाचा प्रारंभ मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.

तेलंगखेडी मार्गावरील मदर डेअरी प्लान्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी. पी. देवानंद, मराठवऱ्हाड दूग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Nitin Gadkari
Dairy Industry : विदर्भाचा दुग्ध व्यवसाय बळकट होणार? नितीन गडकरींचा पुढाकार

मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘मराठवाडा आणि विदर्भासाठी सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा आजचा दिवस आहे. २०१६ पासून मदर डेअरीसोबत मिळून राज्य सरकार धवल क्रांती आणण्याचे आणि दूध उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. कारण विदर्भातील मुख्य पिकांची अवस्था वाईट आहे. वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले.

दुसरीकडे गडचिरोलीला नक्षल चळवळीने ग्रासल्यामुळे तेथील विकासाला खीळ बसली होती. मात्र मदर डेअरीसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आणि योजना तयार केली. त्यानंतर मदर डेअरीने सुरू केलेले काम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.’’ मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेमुळे विदर्भातील महिला शेतकरी देखील आत्मनिर्भर होतील, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी विदर्भातील दूध उत्पादन वाढण्याची गरज असल्याचे म्हटले.

‘‘विदर्भात हरियाना, पंजाब, गुजरात, राजस्थानातून गायी आणल्या जात आहेत. अशाने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मदर डेअरीशी जुळलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. यांच्यापैकी प्रत्येकाने पाच चांगल्या गायी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्या तर दूध उत्पादन वाढेल. स्थानिक लोकांनी जास्त दूध देणाऱ्या गायी पाळल्या तर त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांनाच फायदा होईल,’’ असेही मंत्री गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Dairy Industry: दुग्ध व्यवसाय आणि पर्यावरण: शाश्वततेच्या नव्या वाटा!

पशुखाद्यासाठी पुढाकार

शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य मिळावे यासाठी मदर डेअरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भात कापसाची सरकी, तूर चुरी, तसेच मका मुबलक प्रमाणात आहे.

यातून जिल्हानिहाय पशुधन विकसित करून ते किफायतशीर किमतीमध्ये दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्याची सूचना गडकरी यांनी मदर डेअरीला केली. नेपिअर ग्रासच्या माध्यमातून वर्षभर हिरवा चारा या पशुधनाला उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनात सुद्धा वाढ होईल, असे ते म्हणाले.

संत्रा बर्फीचे मार्केटिंग

मदर डेअरीच्या मार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशा संत्रा बर्फीचे देखील मार्केटिंग होणे आवश्यक आहे. ही बर्फी शुद्ध संत्र्याच्या पल्पपासूनच तयार केली जाईल. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल, असा विश्‍वास गडकरी यांनी या वेळी व्यक्त केला. श्री. गडकरी यांनी गडचिरोली आणि वाशीम या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये देखील विशेष लक्ष देण्याचे आवाहन मदर डेअरीला केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com