Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

Farm Road : शेतरस्त्याचे जनक म्हणून आमदार पवार यांची राज्यभरात ओळख आहे. त्यांनी आपल्या औसा विधानसभा मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियान राबवत सहा वर्षात तब्बल तेराशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे शेतरस्ते तयार केले.
Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Agrowon
Published on
Updated on

Latur News : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या शेतरस्त्याच्या विषयावर विशेष अभियान राबवून तब्बल सहा वर्षे यशस्वी काम केल्यानंतर औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.

यातूनच त्यांनी मतदारसंघात शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासह गावे टँकरमुक्त करण्यासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. औसा येथे बुधवारी (ता. २४) प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी येत्या डिसेंबरपासून अभियानाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती दिली.

शेतरस्त्याचे जनक म्हणून आमदार पवार यांची राज्यभरात ओळख आहे. त्यांनी आपल्या औसा विधानसभा मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियान राबवत सहा वर्षात तब्बल तेराशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे शेतरस्ते तयार केले. विविध विभागाचा समन्वय करून त्यांनी स्वतःचा आमदार फंड या रस्त्याच्या कामासाठी कारणी लावला.

Agriculture Irrigation
Farm Road: प्रगतीच्या वाटा

यामुळे त्यांचा शेतरस्त्याच्या औसा पॅटर्नचा सर्वत्र गाजावाजा सुरु आहे. आमदार झाल्यापासून व त्यापू्र्वीपासून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच त्यांचे काम सुरू आहे. यासाठी त्यांनी शेतरस्ता, वीज व पाणी ही त्रिसूत्री हाती घेऊन कामाला सुरुवात केली आहे. रस्ता, वीज व पाणी असल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून येणार आहे, या विश्‍वासानेच त्यांनी मतदारसंघात शेतरस्त्याला अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला त्यांनी प्राधान्य दिले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पाणंदरस्ते योजना व स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देत त्यांनी मोठ्या संख्येने शेतरस्ते तयार केले. त्यानंतर चांगल्या दाबाने शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी उपकेंद्र व वीज व्यवस्था उभी केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतूनही मतदारसंघात कामे केली.

Agriculture Irrigation
Farm Road Issue : शेतरस्त्यांची दयनीय अवस्था

यासोबत रोहित्र (डीपी) जळाला किंवा खराब झाल्यानंतर तातडीने पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी डीपी ऑन ट्रॅक्टर व्हीलची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली. यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसवलेल्या डीपीतून तातडीने वीज पुरवठा करणे शक्य झाले आहे. रस्ता व विजेनंतर आता त्यांनी शेतीसिंचनासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे.

अभियानात काय होणार?

पाणी साठवण क्षमता आणि भूजल पातळी सुधारणार

अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण करणार

साठवण क्षमता कमी झालेल्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणार

साठवण व सिंचनाचे मृत स्रोत जिवंत करणार

गावनिहाय शास्त्रशुद्ध पद्धतीने पाणी अडवणार

विविध उपाययोजनांतून प्रयत्नपूर्वक भूजल पातळी वाढविणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com