Milk Adulteration : दूध उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत; त्यातूनच दूध भेसळ, सहकारमंत्र्यांची स्पष्ट कबुली

Milk Production : राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील दुधाची परिस्थिती, सोयाबीन हमीभाव, शिवभोजन थाळी यासह विविध मुद्दांवर चर्चा केली.
Milk Adulteration
Milk Adulterationagrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील दुधाची परिस्थिती, सोयाबीन हमीभाव, शिवभोजन थाळी यासह विविध मुद्दांवर चर्चा केली. सहकारमंत्री पाटील यांनी देशातील दुधाची मागणी, उत्पादन आणि तफावतीमध्ये फरक आहे यातूनच दूध भेसळ होत असल्याचे वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्केट यार्ड येथील जिल्हा कार्यालयात ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. मंत्री झाल्यानंतर पाटील पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यानिमित्त पक्षाच्यावतीने माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, "देशात दूध उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. त्यातूनच दूध भेसळ होतेय अशी जाहीर कबुली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. त्यामुळे येथून पुढे विषमुक्त अन्नधान्य देण्याला प्राधान्य असेल, त्यासाठी सहकार चळवळीतून प्रयत्न करायचे आहेत. असे प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले".

Milk Adulteration
Saffron Milk : रोज एक ग्लास केसर दूध प्या अन् पाहा कमाल

मंत्री पाटील म्हणाले, "विविध विकास सेवा सोसायटींपासून जिल्हा बँक, राज्य बँक असे सहकाराचे मोठे जाळे आहे. याचा उपयोग सहकार चळवळ आणखी बळकट करण्यासाठी करायचा आहे. विष मुक्त अन्नधान्य देण्याचे आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांना उर्जितावस्था देण्याचे आमचे काम सुरू आहे. सेवा सोसायटी आता डिजिटल करून बिनचूक काम करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे".

"विष मुक्त अन्नधान्यासाठी जीआय ही एक पद्धत सुरू झाली आहे, भविष्यात केंद्र शासनाच्या माध्यमातून यावर भरीव काम केले जाणार आहे. पतसंस्थांचे, जिल्हा बँकेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत." असे पाटील म्हणाले.

हसन मुश्रीफ निवडूण येतील वाटलं नव्हतं...

पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात मराठा समाजाचे वचर्स्व आहे. यामुळे मला वाटलं होतं हसन मुश्रीफ पराभूत होतील. परंतु, त्यांच काम सर्व समाजाला धरून असल्याने त्यांचा दबदबा आहे. मुश्रीफांची विकास कामे भरपूर आहेत. म्हणून ते निवडून आले. मंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात लवकरच राष्ट्रवादीचे स्व मालकीच्या जागेत कार्यालय बांधले जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

पक्षवाढीसाठी खुर्चीचा वापर करा

"खुर्चीचा उपयोग कार्यकर्त्याने पक्ष वाढीसाठी, लोक कल्याणासाठी केला पाहिजे, घरातील सत्ता महिलेच्या हाती असेल तर तेथे लक्ष्मी नांदते त्यामुळे महिलांनीही पुढे आले पाहिजे. लाडक्या बहिणीने वेगळा निकाल दाखवून दिला. परदेश आपल्या देशापेक्षा अधिक पुढारलेला आहे. कारण आपल्यापेक्षा खूप पूर्वी त्यांनी महिलांच्या हाताला काम दिले. आपण चूल मूल करत बसलो. म्हणून आता सहकाराच्या माध्यमातूनही महिलांना सक्षम केले जाणार आहे."

कोल्हापुरातूनच सहकाराचे धडे

"मी गंगावेश तालमीत राहत होतो येथील शहाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. आणि याच कोल्हापुरातून सहकाराचे धडे घेतले. पुढे लातूरमध्ये सोसायटी तयार केली आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी  जिल्हा बँकेत संधी दिली. आज सहकार मंत्री म्हणून काम करीतआहे. ह्या सर्व जडणघडणीत सहकार चळवळ अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातील". अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com