Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy: दूध अनुदान रखडले! शेतकऱ्यांचे १५२ कोटी अजूनही थकले

Dairy Subsidy Pending: पुणे जिल्ह्यातील ५.७७ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण १५२ कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडून अद्याप मिळालेले नाही. जुलै ते सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांत ११ कोटी आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ या दोन महिन्यांसाठी १४१ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे.

Team Agrowon

Pune News: सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या अनुदानाचे थकलेले ११ कोटी आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे १४१ कोटी असे एकूण पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे १५२ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने थकवले आहे. सध्या भरमसाट वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दूध व्यवसाय परवडत नाही, अशामध्ये सरकारने अनुदान रखडवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

शासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना सरकारने जाहीर केली. सदर योजना १ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, सदर योजनेत पुणे जिल्ह्यातील ११८ सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी सहभाग नोंदवला आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती, त्यावेळी दुधाला फॅट ३.५ आणि ८.५ एसएनएफसाठी ३० रुपये दर होता.

यातीन महिन्यांचे १७९ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले असून अजून ११ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.एक ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिलिटर अनुदान २ रुपये वाढ करून ७ रुपये अनुदान देण्याचे जाहीर करून दूध दर फॅट ३.५ आणि ८.५ एसएनएफसाठी २८ रुपये करण्यात आला होता.

हे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. पुणे जिल्ह्यातील ५ लाख ७७ हजार ६०७ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या २० कोटी १६ लाख ३४ हजार ३०१ लिटर दुधाचे प्रति लिटर ७ रुपये दराने १४१ कोटी ७ लाख ८२ हजार ७०९ रुपये अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही.

मागील जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचे १७९ कोटी वाटप केले, परंतु अद्याप ११ कोटी सरकारकडून मिळणे बाकी आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी ७०० हून अधिक प्रस्ताव अनुदानासाठी पुणे जिल्ह्यातील संस्थांनी जमा केले होते, परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या अनुदानासाठी ४३९ फाइल जमा झाल्या आहेत.

कारण की अनुदानासाठी सरकारच्या जाचक अटी, दूध अनुदानही वेळेत आणि मिळेल की नाही यातून दूध अनुदानासाठी प्रस्ताव दिले देखील नाही. मार्च महिना सुरू झाला तरी देखील अनुदान मिळेना त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता मार्च महिन्यात जिल्हा बँकेचे सोसायटीचे कृषी कर्ज शेतकऱ्यांना भरायचे आहे ते भरावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी प्रति लिटर सात रुपये दराने अनुदान

पुणे जिल्ह्यातील ४३९ प्रस्ताव सरकारकडे जमा.

जिल्ह्यातील ५ लाख ७७ हजार ६०७ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान रखडले.

अनुदानाचे एकूण दूध : २० कोटी १६ लाख ३४ हजार ३०१ लिटर.

रखडलेले अनुदान : १४१ कोटी ७ लाख ८२ हजार ७०९ रुपये.

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या अनुदानापौटी १७९ कोटी शेतकऱ्यांना वाटप.

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांतील ११ कोटी रुपये अजून शेतकऱ्यांना देणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT