
Shrivardhan News : श्रीवर्धन ः तालुक्यात आंबा व काजू पिकांचे जेवढे उत्पादन होते, तेवढेच उत्पादन व आर्थिक उत्पन्न कोकम पिकातून मिळू शकते, परंतु काही वर्षांपासून बागायतदारांकडून कोकम लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. कोकमापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारात चांगला भाव मिळत असल्याने त्याच्या लागवडीसाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
श्रीवर्धन तालुक्यात आंबा लागवडीचे उत्पादनक्षम क्षेत्र हेक्टरी १९१० इतके आहे. काजूचे उत्पादनक्षम क्षेत्रफळ हेक्टरी ६४५ तर कोकम लागवडीचे क्षेत्रफळ अवघे हेक्टरी ११.६७ इतके आहे. या आकडेवारीवरून कोकम लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी कोकम लागवडीसाठी उपयुक्त आहेत. उष्ण व दमट हवामान वाढीसाठी पोषक असून, रोपाची लागवड केल्यानंतर पाचव्या वर्षापासून फळधारणेस सुरुवात होते.
नोव्हेंबरअखेरीस कोकमाच्या झाडाला फुले येण्यास सुरुवात होते व मार्च ते मेदरम्यान फळे काढणी योग्य होतात. योग्य वाढ झालेल्या झाडापासून दरवर्षी १५० ते २०० किलो इतकी कोकण फळे निघतात.
तयार कोकम फळाचा भाव ८० ते १०० रुपये शेकडा असतो. तालुक्यात उत्पादन होणाऱ्या कोकम फळापासून बागायतदार अथवा बचत गटांकडून कोकण सरबत, आगळ, आमसुले तयार करीत असून, घरगुती विक्री केली जाते.
कृषी विभागाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व वृक्षजन्य तेलबिया अभियान या दोन योजनांमधून शेतकऱ्यांना सलग क्षेत्रावर व
बांधावर कोकम लागवडीसाठी अनुदान दिले जाते.
कोकम पिकातून रोजगारनिर्मिती
कोकम फळात औषधी गुणधर्म आढळतात. सरबताबरोबर बियांपासून तेल मिळते. विद्यापीठाने कोकम सरबत, आगळ, आमसूल करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यांसह कोकम अर्क काढण्याचे यंत्र विकसित केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.