Cooperative Bank Maharashtra Agrowon
ॲग्रो विशेष

Co-Op Bank Cybersecurity : राज्य बँक रोखणार नागरी, जिल्हा बँकांवरील सायबर हल्ले

Cyber Attack On Bank : सध्या सायबर गुन्हेगारांकडून बँक ग्राहकांबरोबरच बँकांनाही मोठ्या प्रमाणात लुटले जात आहे. त्यामुळे राज्य बँक आणि नागरी, जिल्हा बँकांच्या सुरक्षिततेसाठी सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी ही नवी प्रणाली सुरू केली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्य सहकारी बँकेबरोबरच इतर सहकारी बँका आणि ग्राहकांना सायबर गुन्हेगारांपासून वाचविण्यासाठी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर म्हणजेच सीएसओसी ही सहकार सुरक्षा ही प्रणाली विकसित केली आहे. राज्य सहकारी बँकेच्या या नव्या प्रणालीचे उद्‌घाटन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

नवी मुंबईतील वाशी येथे हे सेंटर सुरू करण्यात आले असून, राज्यातील नागरी बँका, जिल्हा बँका आणि पतसंस्था यांना या सुविधा राज्य बँकेतर्फे दिल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

या सेंटरच्या उद्‌घाटन प्रसंगी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सहकारचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, ‘नाबार्ड’चे मुख्य सरव्यवसस्थापक रश्मी दराद हे उपस्थित होते. या वेळी विविध जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

सध्या सायबर गुन्हेगारांकडून बँक ग्राहकांबरोबरच बँकांनाही मोठ्या प्रमाणात लुटले जात आहे. त्यामुळे राज्य बँक आणि नागरी, जिल्हा बँकांच्या सुरक्षिततेसाठी सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी ही नवी प्रणाली सुरू केली आहे. सायबर हल्ल्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेऊन त्याचे परिणामकारक नियंत्रण करणे आणि असे हल्ले परतवून लावणे तसेच संभाव्य धोक्याच्या सूचना बँकांना देण्याचे काम या यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

‘एआय’चा वापर करून सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सतत निरीक्षणातून संभाव्य धोके शोधून बँकांना अलर्ट देरे, हल्ल्याचा संभाव्य मार्ग शोधणे, बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे मोजमाप करणे, त्यांना सुरक्षेच्या योग्य त्या सूचना करणे, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणेद्वारे बँकांना अहवाल तयार करण्यास मदत करणे, आठवड्यातील चोवीस तास बँकांच्या संगणकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणे, त्यांना संभाव्य धोक्याची वेळीच सूचना देण्याचे काम ही यंत्रणा करणार आहे. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, माजी आमदार जयंत पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘एआय’ची होणार मदत

संगणकीय माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विश्लेषण करून संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याद्वारे भविष्यातील धोके टाळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे.

३५ तांत्रिक कर्मचारी

या केंद्रामध्ये राज्य सहकारी बँकेचे सुमारे ३५ तांत्रिक कर्मचारी सतत कार्यरत आहेत. सहकार क्षेत्राच्या मागणीनुसार या केंद्राची क्षमता वाढविण्याचे राज्य बँकेने निश्‍चित केल्याची माहिती अनास्कर यांनी दिली. या केंद्राच्या माध्यमातून राज्य बँक सदस्य बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही राबविणार असल्याचेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सूनचा मुक्काम श्रीलंकेतच; विदर्भात आणखी किती दिवस उष्णतेची लाट कायम राहणार ?

Kharif Season Farming: खरिपात विद्यापीठाच्या संशोधित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा : डॉ. शरद गडाख

Farmer Issue: न्यायाधीशांना मोफत वीज; मात्र ‘शेतकऱ्यांना पाणी-वीज नाही; शिवसेनेची सरकारवर टीका

Onion Price Crisis: कांदाप्रश्नी दीर्घकालीन उपाययोजना, उद्या केंद्रासोबत बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Land Survey: मोजणी प्रक्रियेसाठी नवे वेळापत्रक १ जूनपासून लागू

SCROLL FOR NEXT