Zucchini Vegetable Agrowon
ॲग्रो विशेष

Exotic Vegetable : पालघरमध्ये सॅलडची ‘झुकिनी’

Zucchini vegetable : शहरातील हॉटेलमध्ये ‘सॅलड’साठी मोठी मागणी असणाऱ्या ‘झुकिनी’ या परदेशी फळभाजीची पालघरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी लागवड झाली आहे.

Team Agrowon

Palghar News : शहरातील हॉटेलमध्ये ‘सॅलड’साठी मोठी मागणी असणाऱ्या ‘झुकिनी’ या परदेशी फळभाजीची पालघरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी लागवड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे पीक उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आसनगाव येथील कृषी तंत्र विद्यालयातील प्राध्यापकांनी व्यक्त केली.

‘झुकिनी’ या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका असले तरी पंधराव्या शतकाच्या सुमारास इटालियन लोकांनी या भाजीच्या लागवडीत सुधारणा केली. ‘झुकिनी’चे बारीक तुकडे तयार करून खाण्यासाठी वापरतात.

फळाच्या गोल चकल्या करून त्यास मीठ लावून ‘सॅलड’ म्हणून कच्च्या स्वरूपात खाल्ल्या जातात. काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येते.

आरोग्यासाठी फायदेशीर

‘झुकिनी’ या भाजीत भरपूर प्रमाणात जीवनसत्त्‍वे, स्निग्ध पदार्थ असतात. फळांच्या सालीमध्ये तंतुमय पदार्थ असतात. त्याच्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात. ‘झुकिनी’च्या फळाचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातो. कारण त्या फळांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. उच्च प्रकारचा रक्तदाबही नियंत्रित केला जातो.

तिन्ही हंगामात उत्पादन

‘झुकिनी’ तिन्ही हंगामात घेता येते. त्याच्यासाठी एक ते सव्वा किलो बियाणे प्रतिएकरसाठी लागते. उन्हाळी शेतीसाठी दोन किलो प्रतिएकर बियाणे लागते. ‘झुकिनी’च्या वाढीसाठी चांगला निचरा होणारी माती सर्वोत्तम आहे. पीएच ६.५ असलेल्या जमिनीत ‘झुकिनी’ची वाढ चांगल्या प्रकारे होते. प्लास्टिक प्रो ट्रे मध्ये ‘झुकिनी’ रोपे तयार करतात. तसेच ग्रीन हाऊसमध्येदेखील वाढविता येतात.

कृषी तंत्र विद्यालयात ‘झुकिनी’सारख्या परदेशी फळभाजीचे अद्ययावत ज्ञान, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान मिळाले, याचा आम्हाला भविष्यात शेतीपूरक व्यवसाय करत असताना फायदा होईल.
- मोनिका ठाकरे, विद्यार्थी, कृषी तंत्र विद्यालय
पालघरला समुद्रकिनारा लाभल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. ‘झुकिनी’ लागवडीसाठी हे प्रमाण पोषक असूनदेखील पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘झुकिनी’च्या ज्ञानाच्या अभावामुळे शेती केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जागृत होऊन ‘झुकिनी’ लागवडीकडे वळावे.
- प्रा. मंदा कोंढारी, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव
‘झुकिनी’ या परदेशी फळपिकाची प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी लागवड करण्यात आली आहे. लागवडीसाठी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
- सोनालिका पाटील, प्राचार्या, कृषी तंत्र विद्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून

Water Storage: गिरणा धरण १०० टक्के भरले; रब्बी हंगामातील पिकांना दिलासा

Farmers Foreign Study Tour: राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी, ४ कोटी निधी मंजूर

Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT