Banana plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Plantation : कांदेबाग केळीची लागवड सुरू

Banana Cultivation : खानदेशात कांदेबाग केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा लागवड किंचित वाढेल किंवा स्थिर राहील.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कांदेबाग केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा लागवड किंचित वाढेल किंवा स्थिर राहील. पाऊस, मजूरटंचाई व नैसर्गिक समस्यांना तोंड देऊन शेतकरी ही लागवड यशस्वी करण्याची धडपड करीत आहेत.

यंदा खानदेशात सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवर कांदेबाग बहरातील केळी बागांची लागवड होईल. ही लागवड सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होते. परंतु बाजारातील दर, कंद, रोपे उपलब्धता व अन्य बाबी लक्षात घेऊन शेतकरी आगाप लागवडी करीत आहेत. परंतु खानदेशातील तापमान सध्या कमी आहे.

पण उकाडा, उष्णता आहे. मध्येच पावसाचे संकेत विविध संस्था देत आहेत. सणासुदीचा काळ आहे. असे असतानाही शेतकरी ही लागवड करीत आहेत. लागवडीसाठी केळी रोपे व कंदांचाही उपयोग केला जात आहे.

रोपांना क्रॉप कव्हर लावण्याची गरज नाही. कारण उष्णता अधिक नाही. पाऊस, ढगाळ वातावरण आदी समस्या खानदेशात सुरूच आहे. अशात रोहित्रांतील बिघाड, वीज बंद होणे आदी समस्याही तयार होत असून, यावर ट्रॅक्टरचलित जनित्राचा पर्यायही शेतकऱ्यांनी शोधला आहे.

खानदेशात कांदेबाग बहरातील केळी लागवडीसाठी जळगावातील जामनेर, चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव, नंदुरबारमधील तळोदा व अक्कलकुवा हा भाग अग्रेसर आहे. अन्य भागातही कमी क्षेत्रात या कांदेबाग बहर केळीची लागवड केली जाते. यंदाची लागवडही स्थिर राहील. कारण शेतकरी कमी लागवडीत काटेकोर व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अनेक भागात पाणी आहे. परंतु वीज व्यवस्थित नसते. यामुळेदेखील कमी लागवड करून त्यात शेतकरी परिश्रम घेऊन कार्यवाही करीत आहेत. सर्वाधिक लागवड चोपडा भागात होईल. ही लागवड सुमारे आठ ते १० हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. यापाठोपाठ यावल, जामनेर, पाचोरा, भडगाव, जळगाव आदी भागांत लागवड होईल. नंदुरबारातील तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातही लागवड मागील तीन वर्षे सतत वाढली असून, तेथे दीड ते दोन हजार हेक्टरवर केळी लागवड अपेक्षित आहे.

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही लागवड एक हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे. केळी लागवडीसाठी कंद मुबलक आहेत. तसेच अनेक कंपन्या रोपांचाही पुरवठा करीत आहेत. रोपांचे दर स्थिर आहेत. १० ते १७ रुपये प्रतिरोप असे केळीच्या उतिसंवर्धित रोपांचे दर आहेत. मध्य प्रदेश, गुजरात व अन्य जिल्ह्यांतील कंपन्याही रोपांचा पुरवठा करीत आहेत. तसेच कंदांचे दरही वेगवेगळे आहेत. कंदांमध्ये ग्रॅण्ड नैन वाणाचा उपयोग अधिक होत आहे. अडीच, तीन, चार ते पाच रुपये प्रतिकंद असे कंदांचे दर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT