HTBT Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

HTBT Cotton : सविनय कायदेभंग करीत ‘एचटीबीटी’ची लागवड

BT Cotton Cultivation : या सविनय कायदेभंग आंदोलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांनी मार्गदर्शन केले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : तुपटाकळी (ता. दिग्रस) येथे दीपक आनंदवार यांच्या शेतावर शेतकरी संघटनेच्या वतीने बंदी असलेल्या तणाला प्रतिकारक जीनचा समावेश असलेल्या (एचटीबीटी) कापूस बियाण्याची लागवड करण्यात आली. सविनय कायदेभंग आंदोलन करीत ही लागवड झाली.

या सविनय कायदेभंग आंदोलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘कायदेशीररीत्या एचटीबीटी नियंत्रणमुक्‍त केल्यास शेतकऱ्यांना कापूस पिकाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणे शक्‍य होईल. त्यामुळे सरकारने या संदर्भाने पावले उचलण्याची गरज आहे.’’

‘‘भारताला दर्जेदार एचटीबीटी कापूस, सोयाबीन आणि मका बियाण्यांची गरज आहे. या माध्यमातून कीड व्यवस्थापनासह तणनियंत्रणही कमी खर्चात शक्‍य होईल. त्यामुळे याला परवानगी मिळावी, याकरिता सरकारने पुढाकार घेतला पाहिजे,’’ अशी अपेक्षा डॉ. मायी यांनी व्यक्त केली.

शेतकरी संघटनेचे (शरद जोशीप्रणीत) अध्यक्ष ललित बहाळे म्हणाले, ‘‘संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मानवी वापरासाठी अत्यंत कमी गॉसिपॉल असलेली सरकी मंजूर केली आहे. अमेरिकेत सरकी पावडर प्रोटीन म्हणून खातात. अल्ट्रा-लो गॉसिपॉल कापूस आनुवंशिकरीत्या सुधारित आहे. आनुवंशिक बदलाने रंगीत कापसाचे उत्पादन शक्‍य आहे.’’

शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष गुणवंत पाटील, तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले, विजय निवाल, माजी आमदार वामनराव चटप यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटिंग, देवेंद्र राऊत, दीपक आनंदवार, चंद्रशेखर देशमुख, हिंमतराव देशमुख, पंडित भेंडे, डॉ. गजानन पारखी, अक्षय महाजन, गोपाळ भोयर, अमोल जवादे, भास्कर पाटील, राहील पठाण, कृष्णराव भोंगाडे, मधुसूदन कोवे, सोनाली भरगड आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT