HTBT Cotton Seed : अवैध एचटीबीटी बियाण्यांबाबत गुणनियंत्रण विभाग सावध

Illegal Sale of HTBT Cotton Seeds : एचटीबीटी कापूस बियाण्यांची चोरट्या मार्गाने अवैधरीत्या विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
Cotton
Cotton Agrowon

Nashik News : नाशिक विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात एकूण साधारणपणे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी ३८ ते ४० लाख कापूस बियाणे पाकिटांची आवश्यकता असते. मात्र बंदी असूनही एचटीबीटी कापूस बियाण्यांची चोरट्या मार्गाने अवैधरीत्या विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. स्थानिक भाषेत या बियाण्याला आरआरबीटी, ४जी, ५जी तर राउंडअप बीटी संबोधले जाते. त्यामुळे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे विक्री रोखण्यासाठी गुणनियंत्रण विभाग सावध झाला आहे.

गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी बीटी कापूस वाण भारतात आले. ग्लायफोसेट या तणनाशकाला प्रतिकार करणारे घटक यात आहेत. मात्र अवैध बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या एचटीबीटी कापूस बियाण्यांची उत्पादकता, वातावरणानुसार कापसाची वाढ कशी होते याबाबत माहिती देत नाहीत. कारण भारतातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने या बियाण्यांची शिफारस केलेली नाही. या बाबतचा कुठलाही अभ्यासपूर्ण संशोधन अहवाल अधिकृतरीत्या प्रसिद्ध झालेला दिसून येत नाही. यामुळे उत्पादन व उत्पन्न वाढीचा हा दावा दिशाभूल करणाराच आहे, असे नाशिक कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने कळविले आहे.

Cotton
Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

वास्तविक पाहिल्यास एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत व उगवण क्षमतेबद्दल कोणतीही उत्पादक किंवा विक्रेते जबाबदारी घेत नाही. हे बियाणे कीड-रोगांना बळी पडते त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच आहे. तसेच चांगले व दर्जेदार बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे नुकसान होते. त्यांचे चांगले बियाणे पाहिजे त्या प्रमाणात विक्री होत नाही, त्यामुळे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री यांनी देखील नाराजी व्यक्त करून या बेकायदा एचटीबीटी विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दुसरे या एचटीबीटी बियाण्यांची खरेदी-विक्री बिगर बिलाने होते. रोखीच्या व काळ्या पैशामुळे सरकारचे नुकसान होते.

बियाणे लागवड पश्‍चात उगवण क्षमता, बोंड न लागणे, उत्पादन कमी येणे अशा अडचणी आल्यास व संबंधित बियाणे खरेदी बिले नसल्यास कृषी विभागाकडे तक्रार करता येणार नाही. याशिवाय ग्राहक मंचात तक्रार स्वीकारली जात नाही. परिणामी नुकसान भरपाई मिळणार नाही, याची काळजी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Cotton
Cotton Seed : जळगावात २७ लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी

या कारणांमुळे एचटीबीटी कापूस बियाण्यांवर बंदी

ग्लायफोसेट घातक रसायन युक्त तणनाशक असून ते मानवी जीवनास, प्राणिमात्रास व पर्यावरणास हानिकारक आहे

ग्लायफोसेटचा अनियंत्रित वापर झाल्यास परागीभवनामुळे शेजारच्या इतर प्रकारच्या तणांमध्ये प्रतिकारक्षमता वाढते

किरकोळ फायद्यासाठी या फसव्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये. अवैध एचटीबीटी कापसाची लागवड करून आपले व आपल्या कुटुंबीयांचे आयुष्य धोक्यात घालू नये. एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या, खासगी व्यक्ती आढळून आल्यास त्यांचे वर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी विभागाकडून किंवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत जनजागृती करण्यासाठी पाच भागात व्हिडिओ तयार करून प्रसारित केले आहेत.
उल्हास ठाकूर, तंत्र अधिकारी, गुणनियंत्रण, नाशिक कृषी विभाग
केंद्र सरकारच्या जीईसी समितीची या बियाण्यास मान्यता नाही. तसेच विद्यापीठांची शिफारस नाही. त्यामुळे अशा प्रकारचे बियाणे विक्री म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे बियाणे खरेदी टाळावी. ज्या शेतकऱ्यांनी आजवर लागवड केली ते फसलेले आहेत. ते पक्के बिल नसल्याने तक्रार करू शकत नाही. शेतकऱ्यांनी शिफारशीत वाणाचीच लागवड करावी.
मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक-कृषी विभाग, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com