Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : विजेच्या लपंडावाने पिके सुकू लागली

Electricity : उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, खराडेवाडी आदी गावांत सातत्याने वीज खंडित होत असल्याने शेतीपंप सुरू ठेवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गणेश कोरे

Baramati News : परिसरातील गावात विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. विहिरीत पाणी असूनदेखील सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिके सुकू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, खराडेवाडी आदी गावांत सातत्याने वीज खंडित होत असल्याने शेतीपंप सुरू ठेवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विहिरीत पाणी असून देखील शेतकऱ्यांना पिकांना देता येत नाहीत, अशी स्थिती आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ऊस, मका, कांदा, गुलछडी व रब्बी हंगामात ज्वारी आदी पिके घेतली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर कडक उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याला आली आहेत. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री व दिवसा शेतात धावपळ करत आहेत.

मात्र गेल्या आठ दहा दिवसांपासून परिसरात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेताला पाणी देण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. यातच भारनियमन देखील असल्याने पिकाला पाणी द्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने नंतर शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे.

त्यामुळे विहिरीत पाणी असूनदेखील विजेअभावी शेतातील पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. याकडे महावितरण कंपनीने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करून द्यावा, अशी मागणी कारखेल येथील शेतकरी भानुदास भापकर, लालासाहेब भापकर व सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोसले यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT