Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : विदर्भात ३८ हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका

Hailstorm : विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपीट, पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपीट, पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ९७८९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने काही जिल्ह्यांची आकडेवारी दुसऱ्या दिवसांपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानंतर आता पुन्हा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला. १० व ११ फेब्रुवारी असे सलग दोन दिवस विदर्भात पावसाची नोंद झाली. बाधितांमध्ये पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत कोणतेच नुकसान नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

अवकाळी पाऊस, गारपिटीचा सर्वाधिक फटका नागपूर जिल्ह्याला बसला असून ११ तालुक्यांतील ३६३ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये ११७०० शेतकऱ्यांचे ९५० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी दिली. बाभूळगाव (यवतमाळ) जिल्ह्यात ३१४० तर उमरखेड तालुक्‍यात ६०७२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगितले.

धामणगाव रेल्वे (अमरावती) तालुक्‍यात २५७५ हेक्‍टर नुकसान नोंदविण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यात केवळ अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात मका पिकाचे नुकसान झाले. १७ गावांतील ३१८ शेतकऱ्यांचे ९० हेक्‍टर क्षेत्रावरील मका पिकाचे बाधित क्षेत्र आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यात १११ गावांमध्ये ६३५६ शेतकऱ्यांचे एकूण ४४२३ हेक्‍टरचे नुकसान झाल्याची माहिती एसएओ प्रभाकर शिवणकर यांनी दिली. भंडारा जिल्ह्यात साकोली, लाखनी, पवनी या तालुक्ं‍यात १९०० हेक्‍टर बाधित झाले असल्याचे अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी सांगितले. पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, पोंभूर्णा, चिमूर या तालुक्ं‍यात नुकसान झाले असले तरी नुकसानीचा प्राथमिक अंदाज अंतिम झाला नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची दखल घेत वनमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. आपदग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून मदतीपासून कोणीही वंचित राहू नये, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशीत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT