Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Damage: पावसाअभावी जिरायती पट्ट्यात पिके जळाली

Agriculture Crisis: खरिपाच्या सुरुवातीला मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या केल्या. मात्र जून आणि जुलै महिन्यांत पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील जिरायती पट्ट्यातील पिके पाण्याअभावी सुकून जळाली आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: खरिपाच्या सुरुवातीला मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या केल्या. मात्र जून आणि जुलै महिन्यांत पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील जिरायती पट्ट्यातील पिके पाण्याअभावी सुकून जळाली आहेत.

मका, कापूस, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन पिकांवर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षा होत्या, पण पावसाच्या अभावाने ही पिके उभ्या डोळ्यांसमोर करपून गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी दोन लाख २ हजार २६३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ८५ हजार ३४८ हेक्टर म्हणजेच ९२ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, शिरूर, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर तालुक्यांत कमी पाऊस पडला आहे.

प्रामुख्याने इंदापूर तालुक्यातील भिगवण, मदनवाडी, शेटफळगढे, म्हसोबावाडी, निरगुडे, लामजेवाडी, अकोले, कळस, पिंपळे आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी मका, उडीद, तूर, कापूस, बाजरी आणि सोयाबीनच्या पेरण्या केल्या.

मात्र त्यानंतर पाऊसच न झाल्याने मका दोन ते तीन फूट वाढून पाण्याअभावी खुंटली, उडीद वीतभर वाढून करपून गेली, तर तूर, कापूस आणि बाजरीचीही अशीच अवस्था झाली आहे. जिरायती पढ्यातील पिके पूर्णपणे नष्ट झाली असून, बागायती भागातील पिके कशीबशी तग धरून आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी दयनीय अवस्था झाली आहे.

प्रशासनाकडून अपेक्षा

खडकवासला कालव्यात पाणी सोडणे, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे या सारख्या उपाययोजना प्रशासनाने तातडीने करण्याची गरज आहे. अन्यथा, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Buffalo Farming: म्हैसपालनात स्वच्छता, चारा, आरोग्यावर भर

De-Dollarization: डॉलरच्या दबदब्याची अस्ताकडे वाटचाल

Fertilizer Shortage: उशिरा आलेली जाग

Lumpy Skin Disease: सिंधुदुर्गाला ‘लम्पी’चा विळखा

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाला मिळणार ‘लाडकी बहीण’चा हप्ता

SCROLL FOR NEXT