Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : संततधार पावसाने कोवळी पिके धोक्यात

Monsoon Rain : किल्लेधारूर तालुक्यात आठ ते दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शेतपिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

Team Agrowon

Kille Dharur : किल्लेधारूर तालुक्यात आठ ते दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शेतपिकांना याचा मोठा फटका बसत आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, उडीद, मूग, तूर पिवळे पडत आहेत. कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून हंगाम धोक्यात आला आहे.

यंदा मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झाली. तसेच वातावरणदेखील पोषक असल्याने खरीप पिके जोमात आली आहेत. मात्र, आठ-दहा दिवसांपासून बीड जिल्ह्यासह धारूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे.

शेतात पाणी साचून राहत असल्यामुळे खरीप पिके सोयाबीन, मूग, उडीद, तूर पिवळे पडत आहेत. ढगाळ वातावरण असल्याने किडीचादेखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

संततधार सुरू असल्याने फवारणीदेखील करता येत नाही. यावर्षी योग्यवेळी पाऊस पडल्याने धारूर तालुक्यात पेरणी योग्य क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड केली आहे.

संततधार पावसामुळे कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शासनाने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT