Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पिके पाण्यात, सर्व्हर डाउन अन्‌ शेतकरी हतबल

Crop Insurance : उत्तर सोलापूर तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली आहेत.

Team Agrowon

Solapur News : उत्तर सोलापूर तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली आहेत. जमिनीतील ओल न हटल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पीक विमाधारक शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक १४४४७ वर कॉल केला असता पोर्टल बंद आहे, असे उत्तर मिळत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

गेल्या आठवडाभरात पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. या दमदार पावसामुळे तालुक्यातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

या नुकसानीची तक्रार दाखल करण्यासाठीचे पीक विम्याचे ॲपही सध्या काम करत नाही. या ॲपवर नुकसानीची तक्रारी नोंदविण्यास अडचणी येत आहेत. ७२ तासांच्या आत पिकांच्या नुकसानीची तक्रार न दिल्यास पीकविमा कंपनीकडून पंचनामा केला जात नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

सततच्या पावसामुळे उत्तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने सरसकट पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत तातडीने करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गेल्या आठवडाभरामध्ये बीबीदारफळ, रानमसले, वडाळा, नान्नज आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे कांदा, सोयाबीन पिके पाण्यात आहेत. विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावरूनही पोर्टल बंद आहे, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, ॲपवरून तक्रार नोंदविण्यासही सर्व्हर डाउन असल्या कारणाने अडचणी येत आहेत. यामुळे आम्ही नेमकी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- नागेश नन्नवरे, कृषिभूषण शेतकरी, बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर
पीकविमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेला टोल फ्री क्रमांक बंद असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर सर्व्हर डाउन असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत विमा कंपनीच्या प्रतिनिधीला कळवले असून, ऑफलाइन तक्रार घेण्याबाबतची शक्यता पडताळून पाहात आहे.
- डी. एस. गवसाने, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT